शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सदस्य असणे गुन्हा आहे का?; उपराष्ट्रपतींचा सवाल, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मनुवादी...”
2
मुलगी खांद्यावर, देश पाठीशी आणि बाजूला भाऊ; Rohit Sharma च्या आईची भावनिक पोस्ट
3
6 वर्षांनंतर आणखी एक 'बुरारी कांड', एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळले
4
लोकसभेत राहुल गांधी बोलण्यास उभे राहताच माईक बंद होतो? आरोपांमुळे ओम बिर्ला संतप्त, म्हणाले...
5
भारत जिंकला म्हणून आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव, BJP च्या मागणीवरून विरोधकांचा गोंधळ
6
"मी प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च पतीनं करावा...", पत्नीची विचित्र मागणी
7
तुमच्या मुलांना तुम्ही चहा-बिस्किट देता का?; होऊ शकतं मोठं नुकसान, पालकांनो व्हा सावध
8
पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले
9
'हे न्याय व्यवस्थेचे भारतीयकरण ...', गृहमंत्री अमित शहा यांनी तीन नवीन कायद्यांबाबत सांगितलं
10
कपूर खानदानातला 'हा' व्यक्ती अभिनेता म्हणून 'सुपरफ्लॉप' पण बिझनेसमन म्हणून 'सुपरहिट'!
11
"फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार"; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
'धनंजय मुंडे यांच्या राईट हॅन्डने बबन गित्तेंना अडकवलं'; रोहित पवारांचा गंभीर आरोप
13
पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या नेमक्या उपाययोजना काय?, नाना पटोलेंचा सवाल
14
अरविंद केजरीवाल यांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव, CBI च्या अटकेविरोधात दिले आव्हान
15
जुलै प्रारंभ: ‘या’ राशींवर हरिहराची कृपा, पदोन्नती-पगारवाढ; धनलाभाची संधी, शुभ-लाभाचा काळ!
16
लंडनमध्ये प्रिया बापटवरून उमेश कामतचं एका व्यक्तीसोबत जुंपलं भांडण, व्हिडीओ व्हायरल
17
एअरटेलसह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, वाढवलं टार्गेट प्राईज; करू शकतात मालामाल
18
Sanjay Singh : "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता गुन्हा केलाय की अटक करण्यात आली?, भाजपा उत्तर देईल का?"
19
अगर किसी चीज को शिद्दत से चाहो... रोहितचा वर्ल्डकप ट्रॉफीसोबत खास फोटोशूट, पाहा Photos
20
"राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं"; नव्या फौजदारी कायद्यांवरुन शरद पवारांचा खोचक टोला

आमदारकी संपताच शिंदेंचा शिलेदार दानवेंच्या केबिनमध्ये; उद्धव ठाकरेंना भेटले, विनवणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 8:30 PM

शिंदे गटात गेलेल्या कोणालाही परत घेणार नाही अशी उघड भुमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तरीही काही आमदार पुन्हा ठाकरेंसोबत येण्यास तयार असल्याची चर्चा सुरु आहे.

राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी गुरुवारी शरद पवार गटात जाण्यासाठी जयंत पाटलांची भेट घेतल्याचे वृत्त असताना आज शिंदे गटासोबत गेलेल्या आमदाराने उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. या आमदराची विधान परिषदेची टर्म गुरुवारी संपली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या माजी झालेल्या आमदाराने थेट विधान परिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवेंचे दालन गाठत ठाकरेंची भेट घेतली. 

शिंदे गटात गेलेल्या कोणालाही परत घेणार नाही अशी उघड भुमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तरीही काही आमदार पुन्हा ठाकरेंसोबत येण्यास तयार असल्याची चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे निवडून आलेले खासदार पाहता या आमदारांना त्यांच्या आमदारकीची भीती वाटू लागली आहे. परंतू ठाकरेंनी दारे बंद केल्याचे जाहीर केल्याने या आमदारांची कुचंबना होऊ लागली आहे. 

तरी देखील आज विधानपरिषदेचे माजी आमदार  गोपीकिशन बजोरिया यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. बजोरिया यांची काल आमदारकीची टर्म संपली आहे. यावेळी मुलगा विप्लव बजोरिया देखील सोबत होता. या दोघांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दुपारीच दानवेंची केबिन गाठली होती. ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा घेण्याची विनवणी बजोरिया यांनी ठाकरेंकडे केली. परंतू ठाकरे यांनी बजोरिया यांना पक्षात घेण्यास स्पषअट नकार दिल्याचे सांगितले जात आहे. 

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने व शिंदे सरकारचे शेवटचे अधिवेशन असल्याने ठाकरे विधानसभेत आले होते. काल देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे एकाच लिफ्टने विधानभवनात गेले होते. यामुळे भाजपा ठाकरे पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. यानंतर सायंकाळी अजित पवार गटाच्या चार ते पाच आमदारांनी शरद पवारांच्या गोटात येण्यासाठी जयंत पाटलांची भेट घेतली होती. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभा