पुणे - विठूरायाच्या भेटी आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होत आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान देहूनगरीतून होणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात दाखल होतात. संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत मुक्ताई यांच्यासह संत गजानन महाराज यांच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी 25 जून रोजी आळंदीतून प्रस्थान करेल. वारकऱ्यांच्या उत्साह दिवसेंदिवस वाढत जाणार असून टाळ मृदुंग, हरिनामाचा गजर या भक्तिमय वातावरणात अवघा महाराष्ट्र पुढील काही दिवस तल्लीन होणार आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक
सोमवार, २४ जून २०१९इनामवाडा, श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान
मंगळवार, २५ जून २०१९ इनामवाडा (पहिला विसावा)निगडी(दुपारचा विसावा)विठ्ठल मंदिर, आकुर्डी (रात्रीचा मुक्काम)
बुधवार , २६ जून २०१९आकुर्डी (पहिला विसावा)दापोडी (दुपारचा विसावा)निवडुंग्या विठोबा, पुणे (रात्रीचा मुक्काम)
गुरुवार , २७ जून २०१९निवडुंग्या विठोबा(रात्रीचा मुक्काम)
शुक्रवार , २८ जून २०१९ पुणे - (पहिला विसावा)हडपसर (दुपारचा विसावा)लोणी काळभोर - (रात्रीचा मुक्काम)
शनिवार , २९ जून २०१९लोणी काळभोर (पहिला विसावा)उरळी कांचन (दुपारचा विसावा)यवत (रात्रीचा मुक्काम)
रविवार , ३० जून २०१९यवत (पहिला विसावा)भांडगाव(दुपारचा विसावा)वरवंड (रात्रीचा मुक्काम)
सोमवार , १ जुलै २०१९वरवंड (पहिला विसावा)पाटस (दुपारचा विसावा)उंडवळी गवळ्याची (रात्रीचा मुक्काम)
मंगळवार , २ जुलै २०१९उंडवळी गवळ्याची (पहिला विसावा)बऱ्हाणपूर( दुपारचा विसावा)बारामती (रात्रीचा मुक्काम)
बुधवार , ३ जुलै २०१९बारामती (पहिला विसावा)काटेवाडी(दुपारचा विसावा)सणसर( रात्रीचा मुक्काम)
गुरुवार , ४ जुलै २०१९सणसर(पहिला विसावा)बेलवंडी - पहिलं गोलरिंगणनिमगाव केतकी (रात्रीचा मुक्काम)
शुक्रवार , ५ जुलै २०१९निमगाव केतकी (पहिला विसावा)इंदापूर - दुसरं गोलरिंगण इंदापूर - (रात्रीचा मुक्काम)
शनिवार , ६ जुलै २०१९ इंदापूर (पहिला विसावा)बावडा (दुपारचा विसावा)सराटी (रात्रीचा मुक्काम)
रविवार , ०७ जुलै २०१९सराटी - तिसरं गोलरिंगणअकलूज (रात्रीचा मुक्काम)
सोमवार , ०८ जुलै २०१९अकलूज (पहिला विसावा)माळीनगर - पहिलं उभेरिंगणबोरगाव (रात्रीचा मुक्काम)
मंगळवार , ०९ जुलै २०१९बोरगाव (पहिला विसावा)माळखांबी (दुपारचा विसावा)पिराची कुरोली(रात्रीचा मुक्काम)
बुधवार , १० जुलै २०१९पिराची कुरोली (पहिला विसावा)बाजीराव विहीर - दुसरं उभेरिंगणवाखरी तळ (रात्रीचा मुक्काम)
गुरुवार , ११ जुलै २०१९वाखरी (पहिला विसावा) वाखरी - तिसरे उभेरिंगण पंढरपूर (रात्रीचा मुक्काम)
शुक्रवार , १२ जुलै २०१९पंढरपूर नगरप्रदक्षिणापंढरपूर (रात्रीचा मुक्काम)
मंगळवार, १६ जुलै २०१९विठ्ठल रुक्मिणी भेट
बुधवार - १७ जुलै २०१९संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु