मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्र मासिकातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयीच्या दोन लेखांवरून काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. तर यावरूनच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला असून, महाराष्ट्रातील उरल्या सुरल्या काँग्रेसची विचारांची "शिदोरी" आता संपली असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्र मासिकेत सावरकर यांच्याविषयी लेख छापण्यात आले आहे. तर यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, राज्य सरकारने ‘शिदोरी’ या मुखपत्रावर बंदी घालावी अशी मागणीही भाजपकडून करण्यात येत आहे.
तर यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रातील उरल्या सुरल्या काँग्रेसची विचारांची 'शिदोरी' आता संपली त्यामुळे सावरकरांना बदनाम करणारे गलिच्छ लेखन ते करीत आहेत. त्यामुळे 'शिदोरी'त अपमान करणाऱ्या या 'माजोरी' काँग्रेसला सावरकरांचा महाराष्ट्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही शेलार म्हणाले.