पुणे : आम्ही सचिवालयाचं मंत्रालय केलं, परंतु फडणवीसांनी मंत्रालयाचं आत्महत्यालय केलं अशी टीका अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली.
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप आज पुण्यात होत आहे. या सभेला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, युवा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम आदी उपस्थित आहेत. व्यासपीठावर मागच्याच बाजूला भला मोठा डिजीटल स्क्रीन लावण्यात आला होता. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप आज पुण्यात होत आहे. त्यावेळी ते बोलत होते.
स्मार्ट सिटीच्या उपक्रमावर टीका करताना चव्हाण म्हणाले, स्मार्ट सिटी मध्ये कचऱ्याचे ढीग लागले आहेत. सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पुण्यात सध्या सगळंच उणे आहे. शहरात खंडणी वसूल केली जात आहे. काँग्रेस सत्तेत असतं तर पुण्याची मेट्रो सर्वात आधी केली असती. भाजप सरकार मेट्रोमध्ये पुण्याला सावत्रपणाची वागणूक देत आहे. पुणे आता टोळी युद्धाची राजधानी झाले आहे. कदम, छिंदम यांच्या वक्तव्यातून भाजपची संस्कृती दिसून येते. शेतीला दाम आणि बेकारांना काम दिलं तर मंत्रालयात जाळ्या लावण्याची गरज येणार नाही.