शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

अशोक चव्हाणांवरील अपात्रतेची टांगती तलवार दूर

By admin | Published: September 13, 2014 4:46 AM

भोकर मतदारसंघातून लढविलेल्या २००९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कायद्यानुसार अपेक्षित असलेला वस्तुनिष्ठ हिशेब न दिल्याबद्दल दोषी ठरविणारा निवडणूक आयोगाचा निकाल

नवी दिल्ली : भोकर मतदारसंघातून लढविलेल्या २००९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कायद्यानुसार अपेक्षित असलेला वस्तुनिष्ठ हिशेब न दिल्याबद्दल दोषी ठरविणारा निवडणूक आयोगाचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केल्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या डोक्यावरील तीन वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढण्यास अपात्र ठरण्याची टांगती तलवार दूर झाली.या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेले डॉ. माधव किन्हाळकर यांनी अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध ‘पेड न्यूज’ आणि निवडणूक खर्चाचा वास्तव हिशेब न देणे या दोन मुद्द्यांवर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तीन वर्षांत पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत कज्जेदलाली झाल्यानंतर गेल्या १३ जुलै रोजी निवडणूक आयोगाने या तक्रारीवर निकाल दिला होता. त्यात ‘पेड न्यूज’ प्रकरणी अशोक चव्हाण यांना आयोगाने निर्दोष ठरविले होते. मात्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व अभिनेता सलमान खान यांच्या प्रचारसभांच्या जाहिरातींसाठी झालेला आपल्या वाटचा १६,९२४ रुपयांचा खर्च चव्हाण यांनी हिशेबात दाखविला नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवून याबद्दल त्यांना लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १०एनुसार तीन वर्षांसाठी पात्र का ठरवू नये, अशी कारणे दाखवा  नोटीस बजावली होती. आयोगाच्या या निर्णयास अशोक चव्हाण यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.न्या. सुरेश कैत यांनी चव्हाण यांच्या बाजूने १०१ पानी निकाल देत त्यांंना दोषी धरणारा आयोगाचा निकाल व त्यासोबत काढलेली अपात्रतेसंबंधीची नोटीसही रद्द केली. एप्रिलमध्ये झालेली लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी चव्हाण यांनी भोकरच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तरीही आयोगापुढील प्रकरणाच्या निमित्ताने कदाचित त्यांची खासदारकीही जाण्याची टांगती तलवार कायम होती. उच्च न्यायालयाच्या निकालाने ती दूर झाली.चव्हाण यांच्यावतीने ज्येष्ठ वकील व माजी केंद्रीय कायदामंत्री कपिल सबिबल यांनी केलेला युक्तिवाद पूर्णांशाने मान्य करत न्यायालयाने म्हटले की, विधानसभा निवडणुकीत खर्चाची कमाल मर्यादा १० लाख रुपये होती. चव्हाण यांनी सहा लाख ८५ हजार १९२ रुपये खर्चाचा हिशेब रीतसर सादर केला होता. त्यामुळे वादग्रस्त १,६२४ रुपयांचा खर्च आपण नव्हे तर पक्षाने केलेला सामायिक खर्च होता हे चव्हाण यांचे म्हणणे वादासाठी बाजूला ठेवून ती रक्कम गृहित धरली तरी त्यांचा निवडणूक खर्च कमाल मर्यादेच्या आतच राहतो. अशा परिस्थितीत आयोगाने त्यांना खर्चाचा सुधारित हिशेब सादर करण्याची संधी न देता थेट दोषी धरून अपात्रतेचा बडगा उगारणे चुकीचे होते.न्यायालयाने असेही म्हटले की, हा १,६२४ रुपयांचा जाहिरातींवरील खर्च करण्यास चव्हाण किंवा त्यांच्या निवडणूक एजन्टने संमती दिली होती, यास तक्रारदार किन्हाळकर यांच्या सरळसोट विधानाखेरीज कोणताही पुरावा नव्हता. तरीही चव्हाण यांना या मुद्द्यावर खुलासा करण्याची संधीही न देता आयोगाने त्यांच्यावर ठपका ठेवला. (लोकमत न्यूज नेटवर्क)