शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

Ashok Chavan: कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान, अशोक चव्हाण यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 6:18 PM

Ashok Chavan: कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातही आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या संख्येने मतदान केले तर आपला विजय होऊ शकतो

कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातही आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या संख्येने मतदान केले तर आपला विजय होऊ शकतो. एमआयएम व बीआरएस हे दोन पक्ष महाराष्ट्रात मतविभाजनाचे काम करतात व त्याचा थेट फायदा भाजपाला होतो. काँग्रेसला सत्तेत आणण्यासाटी अल्पसंख्याक समाजाने एकजुटीने काँग्रेसच्या मागे उभे रहावे, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.   

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या व या निवडणुकीने देशात डबल इंजिनची गरज नाही हे दाखवून दिले. डबल इंजिनची गरज तेव्हाच पडते जेव्हा एक इंजिन बंद पडते परंतु काँग्रेसकडे एकच भक्कम व ताकदवान इंजिन आहे आणि ते म्हणजे राहुल गांधी. देशाचे पंतप्रधान कर्नाटकच्या गल्ली-बोळात फिरले पण त्याचा काही परिणाम झाला नाही. कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातही आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या संख्येने मतदान केले तर आपला विजय होऊ शकतो. एमआयएम व बीआरएस हे दोन पक्ष महाराष्ट्रात मतविभाजनाचे काम करतात व त्याचा थेट फायदा भाजपाला होतो. काँग्रेसला सत्तेत आणण्यासाटी अल्पसंख्याक समाजाने एकजुटीने काँग्रेसच्या मागे उभे रहावे, असे अवाहनही चव्हाण यांनी केले.    

यावेळी बोलताना माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, महाराष्ट्रात संभाजीनगर, अकोलासह काही भागात दोन धर्मात द्वेष पसरवून वातावरण अशांत करण्याचे काम केले गेले पण आपण सर्वांनी समजूतदारपणे परिस्थिती हाताळली. समाजात विष पेरण्याचे काम आरएसएस व भाजपा करत असताना राहुल गांधी मात्र मोठ्या धैर्याने त्यांचा मुकाबला करत आहेत.राहुल गांधी यांनी ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ सुरु करण्याचे चांगले काम केले आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत हिजाब, हलाल, सारखे धार्मिक मुद्दे आणले त्याने काम होत नाही हे दिसताच ‘केरला स्टोरी’ आणली. देशाचे पंतप्रधान जे विश्वगुरु म्हणवतात त्यांनी या चित्रपटाचे प्रमोशन केले पण जनतेने त्यांचा हा डावही हाणून पाडला.महाराष्ट्रातील प्रमुख शहरात सर्व जाती धर्माच्या प्रमुख व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणा व एकतेचा संदेश देणारे कार्यक्रम राबवा मग कोणतीही धर्मांध शक्ती तुमचे काहीच करु शकणार नाही.त्यांनी रस्त्यावर ‘काटे पेरले तर तुम्ही फुलांचा सडा टाका’आणि भाजपाच्या षडयंत्राला बळी पडू नका, असे आवाहन नसीम खान यांनी केले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस