शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदेंच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 5:37 AM

नांदेड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण आणि सोलापूर मतदार संघातील सुशीलकुमार शिंदे या दोन मातब्बरांच्या अर्जावर अपक्ष उमेदवारांनी घेतलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले.

सोलापूर/ नांदेड : नांदेड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण आणि सोलापूर मतदार संघातील सुशीलकुमार शिंदे या दोन मातब्बरांच्या अर्जावर अपक्ष उमेदवारांनी घेतलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले. चव्हाण यांच्या अर्जावरील निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री पावणेअकरा वाजता दिला व काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला.शिंदे यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या आणि प्रीतम मुंडे यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळण्यात आले. २०१४ च्या निवडणुकीत चव्हाण हे उमेदवार होते. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करताना पत्नी, मुली यांना कोट्यवधींचे कर्ज दिल्याचे नमुद केले होते. तसेच काही मालमत्तांची माहितीही दिली होती, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र कुटुंबियांशी केलेल्या व्यवहाराची कोणतीही माहिती प्रतिज्ञा पत्रात दिली नाही. तसेच काही मालमत्तांबाबतची माहितीही त्यांनी दडविल्याचा आरोप अपक्ष उमेदवार रवींद्र गणपत थोरात आणि बहुजन महापार्टीचे शेख अफजलोद्दीन अजिमोद्दीन यांनी केला होता.उज्वल गॅस एजन्सीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांतील अनुदानाचा थेट लाभ चव्हाण घेत असल्याचेही आक्षेपकर्त्यांचे म्हणणे होते. हे सर्व आक्षेप जिल्हा निवडणूक अधिकारी डोंगरे यांनी फेटाळून लावले.सुशीलकुमार यांचे खरे नाव दगडू शंभू शिंदे हे आहे, पण उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी सुशीलकुमार संभाजीराव शिंदे असा उल्लेख केलेला आहे, असा आक्षेप अपक्ष प्रमोद गायकवाड यांनी घेतला होता; मात्र शिंदे यांनी नावातील बदलाबाबतचे गॅझेट अर्जासोबत जोडल्याचे सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला.तसेच, शिंदे यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला व नावाबाबतही गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता. जयसिद्धेश्वर यांचे मूळ नाव नूरंदय्या गुरूबसप्पा हिरेमठ असे आहे. तसेच ते बेडा जंगम नसून हिंदू लिंगायत आहेत, असा दावा करीत गायकवाड यांनी पुराव्यादाखल शाळा सोडल्याचा दाखला सादर केला. त्यावर शिवाचार्य यांचे वकील संतोष न्हावकर यांनी नावातील बदल केलेले पुरावे व जातपडताळणीचे दाखले सादर केले. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी आक्षेप फेटाळून लावला.- प्रीतम मुंडे यांच्या अर्जावरआक्षेप घेणारे काँग्रेसचे कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मारहाण झाली. तश्ी तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनीही प्रीतम यांच्या अर्जावर काही आक्षेप घेतले, मात्र निवडणूक निर्णय अधिकाºयांनी ते फेटाळून लावले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक