अकोट (अकोला) : गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देऊन नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी अकोट येथे केले. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान स्थानिक खरेदी-विक्री मैदानात सभा पार पडली. त्यावेळी चव्हाण बोलत होते.अशोक चव्हाण म्हणाले, की केंद्रात व राज्यात भाजप-सेनेचे सरकार आहे. या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. जनतेची फसवणूक केली. या सरकारला शेतकरी, युवक, व्यापारी सर्वच कंटाळले आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणून सत्ता स्थापन करणार, सहा महिन्यांनंतर आपलेच सरकार येईल.भाजपा सरकारने शेतकऱ्यांना मदत तर केली नाहीच; परंतु जीएसटीचा कायदाही शेतकऱ्यांकरिता डोकेदुखी ठरला आहे. व्यापाºयांना वर्षात ३६ रिटर्न भरावे लागत आहेत. राज्यात हे सरकार आल्यापासून ११ हजारांच्यावर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत, तर देशात ५० हजारांच्यावर हा आकडा गेला आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.नागपूरकर मुख्यमंत्र्यांचे पश्चिम विदर्भाकडे दुर्लक्षएकेकाळी अकोला जिल्ह्याची ‘कॉटन सिटी’ म्हणून ओळख होती. मात्र, सध्या या जिल्ह्यातील सुतगिरण्या बंद पडल्या असून, नवीन उद्योग सुरू करण्यात आले नाहीत. पश्चिम विदर्भाकडे नागपूरकर मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळापूर येथे केला. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेंतर्गत आयोजित सभेत बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, केंद्र सरकारला राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उत्तर देता येत नसल्याने त्यांनी तत्काळ सीबीआय संचालकांना हटविण्याची घाई केली. यातच भ्रष्टाचार दडला असून, ‘न खाउंगा, ना खाने दुंगा’ची भाषा आता बदलत आहे. २०१४ मध्ये दिलेले अच्छे दिन, नोटबंदी, जीएसटी, शेतकºयांच्या मालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासनांपैकी कुठलेही आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही असे ते म्हणाले.सरकारी संस्थांमध्ये वाढता हस्तक्षेपईडी, सीबीआय यासारख्या सरकारी संस्थांमध्ये सरकारचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला आहे. या संस्थांचा वापर करून सरकार विरोधी पक्षांना वेठीस धरीत आहे. हा एकप्रकारचा ‘कर्करोग’च आहे. हा कर्करोग तुमच्या आमच्यासह सर्वांना गिळंकृत करेल, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
पराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही- अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 4:39 AM