शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

सीएसटी स्थानकात अश्लिल चाळे करणाऱ्या अशोक प्रधानला अटक

By admin | Published: July 12, 2017 9:30 PM

मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकात ‘तपोवन एक्स्प्रेस’मध्ये तरूणीला पाहून अश्लिल चाळे करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकात ‘तपोवन एक्स्प्रेस’मध्ये तरूणीला पाहून अश्लिल चाळे करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 
अशोक प्रधान (20 वर्ष) असे या तरुणाचे नाव असून तो मुळचा भुवनेश्वरचा आहे. 29 जून रोजी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सीएसटी स्थानकावर हा प्रकार घडला. 22 वर्षाची तरुणी कामानिमित्त नाशिकला निघाली होती. यावेळी सीएसटी स्थानकात आल्यावर ती प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर उभ्या असलेल्या ‘तपोवन एक्स्प्रेस’ने नाशिकला जाण्यासाठी निघाली. त्यानंतर स्थानकावर अंधार आणि प्लॅटफॉर्मवर कोणी नाही हे बघून ट्रेनमध्ये थांबलेल्या अशोक प्रधान या विकृत तरुणाने तिच्याकडे पाहून हस्तमैथून करत असल्याचे दिसून आले.  या प्रकारामुळे घाबरल्याने ती तरुणी दुसरीकडे जाऊन उभी राहिली. पण तिथेही तो तिच्यासमोर असणाऱ्या बोगीत जाऊन उभा राहिला आणि अश्लिल चाळे करू लागला. यावेळी तिने पुरावा म्हणून त्या विकृताचा व्हिडिओही काढला. त्यानंतर याची माहिती तिने पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी त्यावेळी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. 
दरम्यान, या झालेल्या प्रकाराबद्दल मीडियाने बातमी दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी अशोक प्रधान याला तब्बल दहा दिवसांनंतर अटक केली आहे. अशोक प्रधान हा मुळचा अशोक प्रधान हा भुवनेश्वरचा असून सध्या तो मुंबईत बिगारी काम करतो. त्याच्यावर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.