मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी इचलकरंजीचे अशोक स्वामी, तर उपाध्यक्षपदी जळगावच्या रोहिणी खडसे-खेवलकर यांची निवड करण्यात आली. स्वामी यांचे नांव सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप (तात्या) पाटील यांनी, तर रोहिणी खडसे-खेवलकर यांचे नांव एन.सी.डी.सी. चे माजी संचालक व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी सुचविले. या निवडीच्या वेळी वस्त्रोद्योग महासंघाचे नूतन संचालक पृथ्वीराज देशमुख, दिलीप पाटील, रणजित देशमुख, राजशेखर शिवदारे, दिपक पाटील, बाबाराव पाटील, चंद्रकांत देशमुख, अनिल कवाळे, दिलीप मुथा, विश्वनाथ मेटे, धनराज खंडेलवाल, चंद्रकांत बडवे, श्रीमती रेश्मा पवार हे उपस्थित होते.महाराष्ट्राचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील व इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी अभिनंदन केले. निवडीनंतर बोलतांना स्वामी व खडसे-खेवलकर यांनी राज्यातील वस्त्रोद्योगाच्या विकासाकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी अशोक स्वामी
By admin | Published: July 02, 2015 12:58 AM