Ganesh Chaturthi 2018; अमरावती जिल्ह्यात इच्छापूर्ती करणारे ‘अष्टभुज’, ‘जागृत’, ‘स्वयंभू’ गणेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:10 PM2018-09-18T22:10:00+5:302018-09-19T10:26:05+5:30

भक्तांची इच्छापूर्ती करणारी गणेशाची तीन शक्तिपीठे जिल्ह्यात आहेत. यात बहिरमचा अष्टभुज महागणपती, वायगावचा उजव्या सोंडेचा गणपती आणि बोराळ्याचा स्वयंभू गणपती यांचा समावेश आहे.

'Ashtabhuja', 'Awakrit', 'Swayambhu' Ganesh, who want to | Ganesh Chaturthi 2018; अमरावती जिल्ह्यात इच्छापूर्ती करणारे ‘अष्टभुज’, ‘जागृत’, ‘स्वयंभू’ गणेश

Ganesh Chaturthi 2018; अमरावती जिल्ह्यात इच्छापूर्ती करणारे ‘अष्टभुज’, ‘जागृत’, ‘स्वयंभू’ गणेश

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात तीन शक्तिपीठे : बहिरम, वायगाव, बोराळा येथे गणेशोत्सवादरम्यान भाविकांची गर्दी

अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भक्तांची इच्छापूर्ती करणारी गणेशाची तीन शक्तिपीठे जिल्ह्यात आहेत. यात बहिरमचा अष्टभुज महागणपती, वायगावचा उजव्या सोंडेचा गणपती आणि बोराळ्याचा स्वयंभू गणपती यांचा समावेश आहे.
श्रीक्षेत्र बहिरम येथे सातपुडा पर्वताच्या शिखरावर अष्टभुजाधारी महागणपती विराजमान आहेत. अखंड पाषाणावर कोरलेल्या या मूर्तीची उंची सात फूट आहे. महान तपस्वी राजयोगी भावसिंह राजाच्या कालखंडातील ती आहे. या मूर्तीच्या आजूबाजूला रिद्धी-सिद्धी आहेत.
नितांत सुंदर, कोरीव, सुबक, प्राचीन तथा वैभवशाली ही मूर्ती भक्तांसह पर्यटकांचेही आकर्षण ठरले आहे. नृत्य गणराजाची रचना असलेली ही मूर्ती मूळची दक्षिणेतील असून, ती प्राधान्याने दक्षिणेत पूजली जाते. या प्रकारची मूर्ती आणि त्यांची उपासना यादवकाळात महाराष्टÑात आली. मर्ू्तिशास्त्रानुसार, शेंदूरवर्णी ही गणपतीची मूर्ती आठ हातांची, उभ्याने नृत्यमुद्रेत असून, डावा पाय वाकलेला आणि पद्मासनावर टेकविलेला आहे. उजवा पाय किंचित वाकवून मोकळा सोडला आहे. सात हातात पाश, अंकुश, अपूप, परशू, दत्त, वलय तथा अंगठी अशी सात आयुध वा वस्तू व आठवा हात नृत्यार्थ रिकामा आहे.
वायगाव येथे उजव्या सोंडेची गणेशमूर्ती विराजमान आहे. सोळाव्या शतकात उत्खननादरम्यान गावाशेजारच्या शेतजमिनीत ती आढळून आली. वायगाव येथील सीतारामजी पाटील इंगोले यांच्या वाड्यातील दिवाणखान्यात ती मूर्ती ठेवली गेली. यालाच पुढे मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले. महाभारतकालीन ही मूर्ती शुभ्र मार्बलची आहे. संपूर्ण एकदंत आणि पद्मासनात बसली आहे. पायात शंख आणि पद्म आहेत.
बोराळ्याचा स्वयंभू गणेश
दोन्ही बाजुबंदात अष्टमहासिद्धी आहेत. मूर्तीच्या डाव्या बाजूला रिद्धी, तर उजव्या बाजूला सिद्धी आहेत. महाराष्टÑात आढळून येणाऱ्या उजाव्या सोंडेच्या अतिप्राचीन मूर्तींपैकी ती एक आहे. बोराळ्याचा स्वयंभू गणपती शेकडो वर्षे जुना आहे. दीडशे वर्षांपूर्वी नित्यानंद महाराजांना या गणपतीने दृष्टांत दिला. दृष्टांतानुरूप ही गणपतीची मूर्ती उत्खननात आढळून आली आणि त्याच ठिकाणी या मूर्तीची स्थापना केली गेली. याच गणेशमूर्तीसमोर नित्यानंद महाराजांची समाधी आहे. हा स्वयंभू गणपती शेंदूरवर्णी आहे. जिल्ह्यातील ही तीनही शक्तिपीठे जागृत आहेत.

Web Title: 'Ashtabhuja', 'Awakrit', 'Swayambhu' Ganesh, who want to

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.