मुंबई : राज्याच्या महाअधिवक्तापदी ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. रोहित देव यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदावर नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त झाले होते. कुंभकोणी हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीशही होते. पदावर कायम होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता.
आशुतोष कुंभकोणी नवे अॅडव्होकेट जनरल
By admin | Published: June 08, 2017 6:56 AM