शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अश्विन नाईकची कोठडीत रवानगी

By admin | Published: December 22, 2015 2:14 AM

व्यावसायिकाकडून खंडणी उकळताना रंगेहाथ अटक केलेल्या गँगस्टर अश्विन नाईकसह त्याच्या पाच साथीदारांची रवानगी २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

खंडणी प्रकरण : विनाकारण अडकविल्याचे नाईकचे म्हणणेमुंबई : व्यावसायिकाकडून खंडणी उकळताना रंगेहाथ अटक केलेल्या गँगस्टर अश्विन नाईकसह त्याच्या पाच साथीदारांची रवानगी २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.दादर येथील बांधकाम व्यावसायिक संतोष पाटील यांच्याकडून खंडणी वसूल करताना अश्विन नाईकला रंगेहाथ अटक करण्यात आली. नाईकसह प्रमोद केळुसकर, जनार्दन सकपाळ, प्रथमेश परब, राजेश तांबे यांना सोमवारी भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने नाईकसह पाचही जणांना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.शिवाजी पार्क येथील संतोष पाटील हे ओम ग्रुपसह भागीदारीत विकासक म्हणून काम करतात. पाटील यांच्या भागीदाराकडून नाईकने यापूर्वी २५ लाखांची खंडणी उकळली होती. त्यापाठोपाठ पाटीलकडेही नाईक टोळीने ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली. या खंडणीतील आगाऊ रक्कम घेण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी नाईक हा केळुसकर आणि इतर साथीदारांसह इनोव्हा कारने दादरच्या भवानी शंकर रोडवर आला होता. बराच वेळ नाईक परिसरात पोलीस आहेत का? याचा अंदाज घेत होता. ठरल्यानुसार, पाटील पैशांची बॅग घेऊन तेथे दाखल झाला. पैशांची बॅग नाईककडे सोपवताच दादर पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली. पोलिसांनीच पाटीलकडे दिलेल्या पैशांच्या बॅगेत केवळ २ लाखांच्या खऱ्या नोटा होत्या. नाईक यांच्या टोळीने यापूर्वी पाटील यांच्या भागीदाराकडून वसूल केलेल्या २५ लाखांसह रिव्हॉल्व्हर, स्कॉर्पियो कार अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे उपायुक्त महेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तक्रारदार विकासक संतोष पाटील आणि प्रमोद केळुसकर या दोघांच्या वादात आपल्याला विनाकारण अडकविल्याचे नाईकने दंडाधिकाऱ्यांसमोर सांगितले. मात्र तुम्ही तेव्हा केळुसकरसोबत काय करत होता? असे विचारताच नाईक निरुत्तर झाला.