शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

तवसाळात होणार आशियातील मोठा तेल शुद्धिकरण प्रकल्प

By admin | Published: October 25, 2015 11:25 PM

अनंत गीते यांची घोषणा : लोकांच्या मर्जीनेच भूसंपादन करणार

शृंगारतळी : गुहागर तालुक्यात तवसाळ येथे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल अशा तीन कंपन्यांचा एकत्रित आशिया खंडातील सर्वांत मोठा, साठ दशलक्ष टन क्षमतेचा तेल शुद्धिकरण प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, यासाठी मंत्रालयाची तत्वत: मान्यता मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी पाटपन्हाळे येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.सध्या देशात जामनगर येथे ४८ मिलियन टनचा रिलायन्स कंपनीचा तेल शुद्धिकरण प्रकल्प आहे. यापेक्षा मोठाप्रकल्प गुहागर तालुक्यात होणार आहे. त्यासाठी सध्या शासनाच्या ताब्यात असलेल्या जागेपेक्षा अधिक जागा लागणार आहे. मात्र, लोकांच्या मर्जीने ती संपादन होणार आहे, असे गीते म्हणाले.पूर्वी आपण हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीला प्रकल्पासाठी जागा दिली होती. मात्र, त्यावेळी पश्चिम घाट संरक्षण क्षेत्र असल्याने मॉरिटोरियम लागले होते. त्यामुळे या प्रकल्पाला परवानगी मिळत नव्हती. अखेर तो प्रकल्प राजस्थानला गेल्याचे गीते म्हणाले. मुंबई-गोवा चौपदरीकरण रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत सत्तर टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबरअखेर शंभर टक्के काम पूर्ण होईल व डिसेंबरमध्ये कामाच्या निविदा मागवण्यात येतील, असे गीते यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, बाळा खेतले, मंगेश पवार, अनंत चव्हाण, प्रल्हाद विचारे उपस्थित होते. (वार्ताहर)केंद्रात दुजाभाव नाहीचराज्य आणि केंद्रामध्ये सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये दुजाभाव आहे का? या प्रश्नावर गीते यांनी केंद्रात कोणताही दुजाभाव नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मी केंद्रात आहे, तोपर्यंत युती तुटणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र, राज्यातील युतीच्या परिस्थितीबद्दल आपल्याला माहिती नाही, असे गीते म्हणाले.ग्रामस्थांच्या मताची उत्सुकता१९९६ मध्ये हिंदुस्थान ओमान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. (एचओपीसीएल) या कंपनीचा प्रकल्प तवसाळ येथे येणार होता. मात्र, त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांचा जोरदार विरोध झाला होता. या आंदोलनात नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनीही भाग घेतला होता. अखेरीस हे क्षेत्र पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात येत असल्याने हा प्रकल्प रद्द झाला. आता या नवीन प्रकल्पाबाबत ग्रामस्थांचे मत काय असणार आहे? याबाबत उत्सुकता आहे.