मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम देशभरात झाला आहे. मात्र, महाराष्ट्रात त्याचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणची नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र, कोरोना मृत्यूचे वाढते प्रमाण चिंतेत भर टाकणारे आहे. कोरोनावरील नियंत्रणासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, १ जूननंतर लॉकडाऊन उठवणार का, यासंदर्भात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यातच आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाष्य केले असून, टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले. (aslam shaikh make statement over lockdown in maharashtra)
लॉकडाऊन शिथीलतेसंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल. ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले, तरच लॉकडाऊन उठू शकतो. पण, सध्याच्या येणाऱ्या नवीन एसओपी प्रमाणे हॉटेल्स, इंडस्ट्री, सलून, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकांना दिलासा देण्यासंदर्भात टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे अस्लम शेख म्हणाले.
पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे; ‘तो’ जीआर रद्द करायला भाग पाडू: नाना पटोले
तिसऱ्या लाटेसाठी सज्ज
तिसरी लाट येणार असून, त्याची पूर्वतयारी म्हणून बालचिकित्सा गृह प्रत्येक कोविड सेंटरमध्ये आरक्षित करीत आहोत. तसेच ब्लॅक फंगस, येलो फंगस यासंदर्भात आम्ही दक्षता घेऊन उपचार सुरू केलेले आहेत, अशी माहितीही अस्लम शेख यांनी दिली. लॉकडाऊन एकदम उघडला जाणार नाही. परंतु, सर्वसामान्यांना दिलासा देणाचा विचार सरकारचा आहे. याबाबतची नियमावली कॅबिनेटनंतर जाहीर करण्यात येईल, असे शेख यांनी सांगितले.
भाजपवाल्यांच्या घरात मुलांचे विवाह करणार नाही; शेतकऱ्यांचा निर्धार!
राज्यात १ जूननंतरही कडक निर्बंध राहतील
रुग्णसंख्या नियंत्रणात येत असली, तरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत अद्याप पूर्ण यश आलेले नाही. संभाव्य तिसरी लाट व त्याचे लहान मुलांवरील परिणामांबाबत सध्या अंदाजच आहेत. कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णतः टळला नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘माझा डॉक्टर’ या संवादाच्या कार्यक्रमात दिला. मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा म्हणजे राज्यात १ जूननंतरही कडक निर्बंध राहतील, याचे संकेत असल्याचे मानले जात आहे.