मुंबई : खोटी डोमिसाइल सादर करून महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या परप्रांतीयांपैकी ७६७ विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले असून त्यांची नावे मंगळवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने संकेतस्थळावर जाहीर केली. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आली आहे.नीट परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना ते राहात असलेल्या राज्यात प्रवेश घेण्यासाठी ८५ टक्के जागा, तर राष्ट्रीय पातळीवर १५ टक्के जागा उपलब्ध आहेत, पण अनेक विद्यार्थ्यांनी दोन अथवा दोनपेक्षा अधिक राज्यांतून ८५ टक्के जागांसाठी अर्ज भरले होते. प्रवेश अर्ज भरण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी खोटी डोमिसाइल प्रमाणपत्र बनविली. एकाच विद्यार्थ्याचे नाव दोन राज्यांतील याद्यांमध्ये जाहीर झाल्यानंतर, हा प्रकार उघडकीस आला.कागदपत्रांच्या पडताळणीनंतर मंगळवारी जाहीर झालेल्या सुधारित सर्वसाधारण यादीत ४९ हजार ८५६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याआधी सर्वसाधरण यादीत ५० हजार ६२३ विद्यार्थ्यांचा समावेश होता.कारवाई होणार का?खोटी डोमिसाइल प्रमाणपत्र देणाºया विद्यार्थ्यांवर कारवाई होणार का?, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांनी केला आहे. संबंधितांच्या कागदपत्रांची तपासणी कशी आणि कधी पूर्ण होणार, त्यावर कारवाई काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सर्वाेच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर मंगळवारीही निकाल अपलोड झालेला नव्हता. त्यामुळे औरंगाबाद न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. परिणामी विद्यार्थ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. बुधवारी रात्री वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची यादी जाहीर होऊ शकते, असे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
७६७ परप्रांतीय विद्यार्थी अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 5:47 AM