शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

पंढरपुरातील विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 12:30 PM

पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. दर्शनासाठी मंदिरात न सोडल्याच्या रागातून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.  

सोलापूर, दि. 14 -  पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत महाजन गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे. दर्शनासाठी मंदिरात न सोडल्याच्या रागातून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.  

रविवारी रात्री 11:30 वाजता मंदिरातून कामकाज संपवून दुचाकीवरून घराकडे निघालेल्या व्यवस्थापक विलास महाजन यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. अज्ञातानं केलेल्या मारहाणीत महाजन गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर तातडीनं महाजन यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले गेले. आता   त्यांची प्रकृती स्थिर आहे.  

परिवहन मंत्री दिवाकर रावते हे पंढरपुरात दर्शनासाठी आले असता त्यांच्या स्वागतासाठी महाजन मंदिरात गेले होते.  मंदिरातून घराकडे परतत असताना त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.  मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी महाजन यांची भेट घेतली असून सध्या  गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

काही दिवसापूर्वीच हंगामी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्यातही मंदिरातच दर्शनासाठी माणसे सोडण्यावरून वाद झाला होता. यानंतर आता थेट वरिष्ठ अधिका-यांना मारहाण होण्यापर्यंत घटना घडू लागल्या आहेत.