Assembly Election Result 2021: बंगालमध्ये भाजपला धक्क्याचा परिणाम; आता ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:35 PM2021-05-02T13:35:56+5:302021-05-02T13:38:18+5:30

Assembly Election Result 2021: महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सत्तांतराबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून, बंगालमधील झटक्यामुळे आता भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

assembly election result 2021 after loss in west bengal will bjp mission maharashtra fail | Assembly Election Result 2021: बंगालमध्ये भाजपला धक्क्याचा परिणाम; आता ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? वाचा

Assembly Election Result 2021: बंगालमध्ये भाजपला धक्क्याचा परिणाम; आता ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? वाचा

Next
ठळक मुद्देभाजपच्या मिशन महाराष्ट्रासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चापश्चिम बंगालमध्ये भाजपच्या पदरात मोठी निराशाभाजप नेत्यांचा दावा फोल ठरण्याची शक्यता

मुंबई: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सर्वांच्या नजरा मात्र पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागलेले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून, तृणमूल काँग्रेसचा विजय जवळपास आता निश्चित मानला जात आहे. यातच आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सत्तांतराबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून, बंगालमधील झटक्यामुळे आता भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. (assembly election result 2021 after loss in west bengal will bjp mission maharashtra fail)

आता केवळ २ मेपर्यंत थांबा, पश्चिम बंगालमधील निकाल समोर आल्यानंतर, महाराष्ट्रातही सत्तांतर होऊ शकते, अशी शक्यता काही भाजप नेत्यांनी वर्तवली होती. मात्र, बंगाल निवडणूक निकालांमध्ये भाजपला मोठं अपयश येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता भाजपचे मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी, २ मेपर्यंत थांबा, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही सत्तांतर होणार असल्याचा दावा केला होता.

फडणवीस यांचेही संकेत

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवू. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता.

अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट जप्त होणार, पंढरपुरात पराभव निश्चित

शरद पवार आणि अमित शहांची भेट

मार्च महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुजरातच्या अहमदाबादमध्ये भेट घेतली होती. ही गुप्त भेट असली, तरी त्यासंदर्भातील माहिती समोर आली.  या भेटीनंतर बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा दावा केला जात होता. यावर, ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी मोघम पण सूचक प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली होती. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा विजय मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, निवडणुकांचे जवळपास सर्व कल हाती आल्यावर भाजपच्या पदरात मोठी निराशा पडल्याचे पाहायला मिळत आहे. बंगालमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्याचा भाजपचा प्लॅन होता. मात्र, बंगालमध्ये पतन झाल्याने भाजपचं मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. राजकीय वर्तुळातील तज्ज्ञ मात्र सत्तांतराचा दावा फेटाळत असून, कोरोनाची परिस्थिती ही त्यामागील मेख असल्याचे बोलले जात आहे. 
 

Web Title: assembly election result 2021 after loss in west bengal will bjp mission maharashtra fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.