शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 9:59 PM

Sharad pawar speech in MVA:

मुंबईतील महाविकास आघाडीच्या सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी महिलांवरील अत्याचारावरून राज्य सरकारवर टीका केली. एकेकाळी कायदा सुव्यस्थेबाबत मोलाची कामगिरी करणाऱ्या राज्यात ६४ हजार महिला बेपत्ता असल्याचा आरोप पवार यांनी केला. तसेच महिलांवरील अत्याचारातही वाढ झाल्याचे ते म्हणाले. तसेच ठाकरेंचा सत्ताकाळ सोडला तर गेली अडीच वर्षे महाराष्ट्राला मागे नेणारा काळ होता असेही पवार म्हणाले. 

शिक्षणासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता. परंतू तिथे भ्रष्टाचार सुरु आहे. गुंतवणुकीत मागे पडला, दरडोई उत्पन्नात मागे पडला. भ्रष्टाचार टोकाला गेला आहे. याचे जिवंत उदाहरण सिंधुदूर्गमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला ते आहे. पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झाले आणि तोच पुतळा पडला. आमच्या शिवछत्रपतींचा अपमान झाला, असा आरोप पवार यांनी केला. तसेच लोकसभेला जशी शक्ती दिली तशी विधानसभेलाही द्या, असे आवाहन पवार यांनी केले. 

मोदींनी पंतप्रधान होण्यासाठी १५ लाख रुपये देण्याची गॅरंटी दिली होती. २ कोटी रोजगार देणार होते. एमएसपी दुप्पट करणार होते. पण त्यांनी यापैकी काहीच केलेले नाही. यांची गॅरंटी फक्त अदानी, अंबानींसाठी, असा टोला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला. 

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. पटोले म्हणाले, ⁠राहूल गांधी जे संविधान दाखवतात त्या लाल रंगावरुन फडणवीस यांनी नक्षलवादी म्हटल, ⁠मात्र आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो, असा पलटवार पटोले यांनी केला.

महाविकास आघाडीच्या ५ गॅरेंटी काय आहेत?

महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.

•    शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन.

•    जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.

•    २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.

•    बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस