शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

शिंदे साहेब, नवीन वर्षात 'हा' एक निर्णय घ्या; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले अनुभवाचे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 5:49 PM

Assembly Winter Session: ''झालं गेलं गंगेला मिळालं. उकिरडा कितीही उकरला तरी त्यातून काही निघणार नाही.''

Assembly Winter Session: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. त्यांनी ठाकरे गटाकडून वारंवार होत असलेल्या टीकांचा खरपून समाचार घेतला. यानंतर विरीध पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी पवारांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांची आठवण करुन दिली. तसेच, नवीन वर्षात एक निर्णय घेण्याची विनंती केली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ''शरद पवारांनीही 78 साली पुलोद स्थापन केलं होतं...हशु अडवाणी, उत्तमराव पाटील त्या मंत्रिमंडळात होते... कधीही मुख्यमंत्र्यांची भाषणं राजकीय होत नाही. एखाद दुसरा चिमटा काढला समजू शकतो...बाहेर ज्यांना सोडून आला, त्यांच्या वृत्तपत्रात काही बातम्या येणार, ते तुम्ही मनाला लावून घेणार आणि ते तुम्ही इथे सांगणार...आम्हाला काय देणंघेणं आहे त्याचं.''

मुलं आहेत म्हणून सोडून द्या

''मुख्यमंत्री महोदय, तुम्ही त्याच्यातून बाहेर या. तुम्हाला बहुमत मिळालंय. तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री झालाय. असल्या छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका. हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही. मला काम कसं मिळेल, बेरोजगारी कशी कमी होणार आहे, शेतकऱ्यांसंदर्भात काय भूमिका घेतली जाणार, याकडे त्यांचं लक्ष. तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करताय. जाऊ द्या. मुलं आहेत म्हणून सोडून द्या. दुसऱ्या कार्यकर्त्यांना प्रवक्ते म्हणून बोलायला सांगा.'' 

प्रवक्त्यांना आता जबाबदारी द्या''मागच्या काळामध्ये झालं.. झालं गेलं गंगेला मिळालं. उकिरडा कितीही उकरला तरी त्यातून काही निघणार नाही...तेच तेच सांगत बसण्यापेक्षा नवीन वर्षं 2023 सुरू होतंय. राज्याचे प्रमुख या नात्याने निर्णय घ्या. कुणी काही बोलत असतील, तर ते माझे प्रवक्ते बघतील. दीपक केसरकर आहेत ना वस्ताद बोलायला, ते आठी पडू देत नाहीत, हसत नाहीत, रडत नाहीत. शांतपणे उत्तर देत असतात. जिथे खोच मारायची तिथे बरोब्बर मारतो. अशी चांगली आम्ही तयार केलेली माणसं तुम्ही घेतली आहेत, त्यांच्यावर जबाबदारी द्या,'' असा चिमटा अजित पवारांनी काढला.

महाराष्ट्राची एक संस्कृती आहे''राज्याच्या 13 कोटी जनतेचे प्रमुख आहात. मुख्यमंत्री आहात. देशाच्या राजकारणात दोन नंबरचं पद महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती, परंपरा. ती जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. त्याची जबाबदारी शिंदे साहेब तुमच्यावर आहे. पुन्हा विचार करा. आपण आपलं चालत राहायचं, बोलणारे बोलत असतात. जनता व्यवस्थित समजून घेते,'' असेही पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन