डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहायक आयुक्त व ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी गणेश सारंगधर बोराडे (५४) याला शनिवारी दुपारी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयात रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे, लाच प्रकरणात बोराडे दुसऱ्यांदा जाळ्यात अडकला आहे.इमारत पाडल्याचा दाखला देण्यासाठी व दोन नगरसेवकांविरुद्ध नोटीस काढण्यासाठी बोराडेने डोंबिवली पश्चिमेतील एका रहिवाशाकडे साडेसहा लाख रुपयांची मागणी केली होती. याविरोधात त्यांनी गुरुवार, ४ नोव्हेंबरला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये देण्याची मागणी त्याने केली होती. शनिवारी दुपारी ३च्या सुमारास डोंबिवली पश्चिमेतील केडीएमसीच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात ही रक्कम स्वीकारताना बोराडेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. दरम्यान, कोणत्या नगरसेवकांना नोटीस काढण्यासाठी बोराडेने पैसे मागितले, ते कोणत्या पक्षाचे आहेत, आदी चर्चा रंगली होती. (प्रतिनिधी)दुसऱ्यांदा झाली लाच प्रकरणी अटकविशेष म्हणजे, यापूर्वी १ फेब्रुवारी २०१४ला बोराडे यांना लाचप्रकरणात अटक झाली होती. कल्याणमधील व्यापारी विमल संकलेशा यांनी दुकानाची दुरु स्ती केली होती. ती बेकायदा असल्याचे सांगून बोराडे यांनी त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती. याविरोधात त्यांनी लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. ठरलेल्या लाचेतील दोन लाख रु पये कय्युम शेख या आपल्या हस्ताकरवी बोराडे यांनी स्वीकारले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्यांना निलंबित केले होते. मात्र, निलंबित आढावा बैठकीत त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.
सहायक आयुक्ताला अटक
By admin | Published: November 06, 2016 2:02 AM