मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून मंडळ वादात अडकले आहे. दहावीची परीक्षा सुरू होण्याआधीच बारावीचे तीन पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर छुप्या पद्धतीने होत असलेल्या मोबाइलच्या वापरावर कडक नजर ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सहायक परीक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मुंबईतील ९७६ परीक्षा केंद्रांवर सहायक परीक्षाकाची नेमणूक करण्यात आली आहे. मोबाइलचा वापर होत असल्याने मंडळाची डोकेदुखी वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी हा उपाय शोधला आहे. परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची नोंद केली जाणार आहे. सहायक परीक्षक म्हणून नियुक्ती करताना दुसऱ्या शाळेतील शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आली आहे. (प्रतिनिधी)
परीक्षा केंद्रांवर सहायक परीक्षकाची नजर
By admin | Published: March 09, 2017 2:00 AM