शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

Atal Bihari Vajpayee : भाजपा-शिवसेना युतीचे अटलजी होते शिल्पकार  

By यदू जोशी | Published: August 17, 2018 5:34 AM

मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेली २५ वर्षे अबाधित असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचे खरे शिल्पकार अटलबिहारी वाजपेयी हेच होते.

मुंबई : मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेली २५ वर्षे अबाधित असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचे खरे शिल्पकार अटलबिहारी वाजपेयी हेच होते. प्रमोद महाजन यांच्या युतीच्या कल्पनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी या दोन अलौकिक राजकीय नेत्यांचा कायमचा स्नेहबंध जुळून आला.१९८९मध्ये झालेल्या शिवसेना-भाजपा युतीचे शिल्पकार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपाचे नेते दिवंगत नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेतले जात असले तरी वाजपेयी यांच्याविषयी बाळासाहेबांना असलेल्या आपुलकीच्या भावनेतूनच युती साकारली गेली. २००३मध्ये भाजपामध्ये अटलबिहारी की अडवाणी, असा नेतृत्वाचा वाद उभा करण्याचा प्रयत्न झाला; तेव्हा एनडीएचे निर्विवाद नेते व पंतप्रधान म्हणून वाजपेयी हेच राहतील, असे बाळासाहेबांनी सांगितले होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून आज केंद्र व राज्यातील भाजपा नेते व सरकारवर सडकून टीका होते. वाजपेयी सरकार असतानादेखील शिवसेनाप्रमुखांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले; पण वाजपेयींवर वैयक्तिक टीका केली नाही. अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर वाजपेयी हे बाळासाहेबांशी चर्चा करीत असत. सूत्र सांगतात की, वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा बाळासाहेब त्यांना म्हणाले, अटलजी आपण काळजी करू नका. मंत्रिमंडळ स्थापन करताना आपण शिवसेनेचा कोटा किती असावा याचे काही दडपण वगैरे ठेवू नका. आपले नेतृत्व ही देशाची गरज आहे. आपण पंतप्रधान होणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थात, वाजपेयींनी त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला सन्मानाने सामावून घेतले. एवढेच नव्हेतर, मनोहर जोशी यांना पुढे लोकसभेचे अध्यक्षपद दिले. भाजपा-शिवसेना युती सरकारमध्ये संघर्षाचे काही प्रसंग १९९५ ते ९९ दरम्यान आले तेव्हा बाळासाहेबांप्रमाणेच अटलबिहारींचा शब्द अंतिम असायचा. दोघांना एकमेकांप्रति कमालीचा आदर होता. युती टिकलीच पाहिजे या मुद्द्याला सर्वोच्च प्राधान्य होते आणि त्यासाठी तडजोड करण्याची तयारी असायची.मुंबईच्या साक्षीने अध्यक्षभारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली अन् या नव्या पक्षाच्या मुंबईतील पहिल्याच अधिवेशनात वाजपेयी अध्यक्ष झाले. त्यांच्या अमोघ वाणीने आणि प्रभावशाली नेतृत्वाने भारावून गेलेले हजारो कार्यकर्ते राज्यात तेव्हाही होते. हजारो किलोमीटरचा प्रवास कधी बसने, कधी कार्यकर्त्याच्या दुचाकीवर तर कधी रेल्वेने करीत चांद्यापासून बांद्यापर्यंत वाजपेयी यांनी असंख्य कार्यकर्ते जोडले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे