वाडा : नागरिकांना वृध्दापकाळात कुणावरही अवलंबून राहाण्याची वेळ येऊ नये यासाठी भारत सरकारने अटल पेन्शन योजना सुरु केली आहे.देशभरात शहरी व ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या सर्व टपाल कार्यालयात ही योजना सुरु झाली असून १८ ते ४० वयोगटातील नागरिकांनी जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन अधिक माहिती घ्यावी कमीत कमी गुंतवणूक करून वृध्दापकाळात अधिक फायदा देणारी ही योजना आहे. दरमहा ४२ रु पये ते २१० रु पये गुंतवणुक करुन वयाच्या साठीनंतर आयुष्यभर दरमहा पाच हजार रु पयांपर्यंत पेन्शन व आपल्यानंतर आपल्या जोडीदारास पेन्शन व त्यानंतर जोडीदाराच्या पश्चात नोंद केलेल्या वारसास १,७०,००० ते ८,५०,००० पर्यंत रक्कम मिळवून देणारी ही योजना आहे. ३१ मार्च २०१६ पूर्वी या योजनेत सहभागी होणाऱ्या खातेदारास केंद्र सरकार वार्षीक गुंतवणुकीच्या रक्कमेवर ५० टक्के किंवा एक हजार रु पये या पैकी जी रक्कम कमी असेल ती पाच वर्षापर्यंत संबंधीत खातेदाराच्या खात्यावर जमा करणार आहे. वृध्दापकाळासाठी अधिक फायदेशीर ठरणा-या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन टपाल खात्याने केले आहे.(वार्ताहर)
पोस्टात सुरु झाली अटल पेन्शन योजना
By admin | Published: March 11, 2016 2:22 AM