मुंबई : केंद्र शासनाने नावीन्यपूर्ण उपक्रमांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशनला प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज’ची स्थापना करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी या लॅबोरेटरीजची स्थापना करण्यात येणार आहे. ५०० अटल टिंकेरिंग लेबोरेटरीज स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.सहावी ते बारावीपर्यंतच्या शाळेमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज’ची स्थापना करण्यासाठी सुरुवातीस १० लाख रुपये देण्यात येणार आहेत. नंतर १० लाख रुपये इतकी रक्कम पाच वर्षांसाठी देण्यात येणार आहे. याचाच अर्थ या प्रकल्पासाठी निवड झालेल्या प्रत्येक शाळांना एकूण २० लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
‘अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज’ स्थापन
By admin | Published: July 04, 2016 4:51 AM