शिरूर : शासकीय वरिष्ठ मुलींच्या बालगृहातील दोन मुलींवर बालगृहातीलच कर्मचारी व त्याच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच याच बालगृहातील दुस:या एका मुलीच्या तक्रारीवरून शहरातील दोन तरुणांवरही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनांची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू करण्यात आली असून, जे जे यात दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे महिला, बालकल्याणचे उपायुक्त रवींद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अनिल (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व सुनील वेताळ (रा. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. उपायुक्त पाटील म्हणाले, की 18 जुलैला मुलींची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर या प्रकरणी चौकशी सुरू केली. दोषींवर कारवाई होईलच, मात्र अधीक्षिका (पूर्णवेळ), शिक्षिका, दोन काळजीवाहक व 1 सफाई कामगार ही पदे त्वरित भरण्यासाठी तातडीची उपाययोजना प्रथम केली जाणार आहे.
आमदार नीलम गो:हे यांनीही बालगृहाला भेट दिली. सखोल चौकशीची मागणी करतानाच त्यांनी, या प्रकरणाची सात दिवसांच्या आत चौकशी करून सत्यशोधन वस्तुस्थिती अहवाल सादर करावा, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. उपायुक्त पाटील यांच्याकडेही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी त्यांनी केली.
4पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये असणारी पीडित मुलगी येथील बालगृहात असताना नगर परिषद शाळेत शिक्षण घेत होती. अनिल याने शाळा सुरू झाल्यापासून ते मार्च 2क्14 दरम्यान शाळेत जाताना पीडित मुलीस वाईट व अश्लील बोलून त्रस दिला, तर सुनील याने मार्च 2क्14 मध्ये शाळेच्या छतावर नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला व त्याची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. 18 जुलैला दाखल झालेले प्रकरण व या प्रकरणाची बालगृहातील कोणालाच कुणकुण लागली नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे.
बाले हे 31 मे रोजीच निवृत्त झाले. या घटनेनंतर 18 जुलैलाच त्यांचे घर खाली करण्यात आले. बालेंच्या निलंबनाची कारवाई दोन दिवसांत होणो अपेक्षित आहे.
- रवींद्र पाटील , बालकल्याणचे उपायुक्त
शासकीय वरिष्ठ मुलींच्या बालगृहातील लैंगिक अत्याचारप्रकरणी येथील प्रभारी अधीक्षिकांना जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने कारणो दाखवा नोटीस बजावली. मात्र, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिका:याला ख:या अर्थाने कारणो दाखवा नोटीस काढण्याची आवश्यकता आहे.
/सविस्तर वृत्त पान 8