शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

मुंबई, ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांकडे एटीएसकडून चौकशी, आतापर्यंत १०० हून अधिक जणांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 5:07 AM

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून  १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. एटीएसच्या विविध पथकांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहितीची देवाणघेवाण केली. दरम्यान, एटीएसने व्यावसायिक मनसुख हिरेन यांचे  शवविच्छेदन करणाऱ्या तीन तज्ज्ञांची चौकशी केली. प्राथमिक अहवालात मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आल्याचे सांगितले. अशात त्यावेळी फुफ्फुसात पाण्याचे प्रमाणही कमी असल्याचे नमूद करण्यात आले होते. मृत्यूपूर्वी 

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबई आणि ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे चौकशी केली. यातील एक अधिकारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या आधी आणि नंतर सचिन वाझे यांच्यासोबत असल्याची माहिती समोर येत आहे.मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून  १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. एटीएसच्या विविध पथकांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहितीची देवाणघेवाण केली. दरम्यान, एटीएसने व्यावसायिक मनसुख हिरेन यांचे  शवविच्छेदन करणाऱ्या तीन तज्ज्ञांची चौकशी केली. प्राथमिक अहवालात मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आल्याचे सांगितले. अशात त्यावेळी फुफ्फुसात पाण्याचे प्रमाणही कमी असल्याचे नमूद करण्यात आले होते. मृत्यूपूर्वी मनसुख यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते.

पुढे एटीएसने डायटम चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल आणि शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीत विरोधाभास आढळून आला. मनसुख पाण्यात पडले तेव्हा ते जिवंत किंवा बेशुद्धावस्थेत होते, अशी माहिती यातून समोर आली. हा अहवाल एटीएस हरियाणा येथील प्रयोगशाळेत अभिप्रायासाठी पाठवणार आहे. त्यानुसार, त्यांचा अभिप्राय येताच पुढील भूमिका घेण्यात येणार असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

    - आतापर्यंतच्या तपासात ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यामुळे दोघांकडे चौकशी करण्यात आली. त्यांचा यात काही सहभाग आहे का? या दिशेनेही चौकशी करण्यात आली. 

- यापैकी एक अधिकारी ३ ते ५ मार्च दरम्यान गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षात (सीआययू) असल्याचे समजते. त्याबाबतही यावेळी चौकशी करण्यात आली. याच काळात ४ मार्च रोजी मनसुख कांदिवली कक्षाच्या तावडे नावाच्या व्यक्तिला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. - त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी त्यांची बरीच शाेधाशाेध करुनही ते सापडले नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक त्यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर तपासात हिरेन ज्यांना भेटायला गेलाे हाेते त्या कांदिवली कक्षात तावडे नावाचा अधिकारी नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकड़ून देण्यात आले होते. त्यामुळे संबंधित अधिकारी येथे क़ाय करत होता?  त्यांचा यात काही सहभाग आहे का? याबाबतही चौकशी हाेईल. - याप्रकरणी आतापर्यंत दाेघांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते, असेही एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.  

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिसMukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरणMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी