शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

एटीएसने परभणीतून आणखी एका युवकास उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2016 5:46 PM

मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातून इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून एका 24 वर्षीय युवकास ताब्यात घेतले

ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. 24 - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातून इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून एका 24 वर्षीय युवकास ताब्यात घेतले असून, या युवकांकडून 1 किलो स्फोटके व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईस दुजोराही दिला आहे़. विशेष म्हणजे मागील आठवड्यातच परभणी शहरातून एका युवकाविरूद्ध या पथकाने कारवाई केली होती़आठ दिवसांपासून दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी परभणी शहरात पाळत ठेवून होते़ काही जणांवर या पथकाला संशय होता़ याच संशयातून २३ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरातून एका युवकाला या पथकाने ताब्यात घेतले आहे़ सदर युवकाकडून एक किलो वजनाच्या स्फोटक साहित्यासह आणखी काही संशयास्पद वस्तूही जप्त केल्याची माहिती समोर येत आहे़ या प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारची कारवाई केल्याच्या वृत्ताला या अधिकाऱ्यानी दुजोरा दिला आहे़ परंतु, ज्या युवकाला ताब्यात घेतले त्या युवकाचे नाव अधिकृरित्या पथकातील अधिकाऱ्यानी जाहीर केले नाही़ . यापूर्वी १३ जुलै रोजी शहरातील गाडीवान मोहल्ला येथील नासेर खान या युवकाविरूद्ध दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून मुंबईत गुन्हा दाखल झाला होता़. त्यानंतर एका आठवड्यातच परभणी शहरातून दहशतवाद विरोधी पथकाने आणखी एका युवकाला ताब्यात घेतले आहे़