शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

एटीएसची टीम उत्तर प्रदेशला

By admin | Published: September 15, 2014 4:02 AM

उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटची एक टीम उत्तर प्रदेशला रवाना झाली आहे.

पुणे : उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटची एक टीम उत्तर प्रदेशला रवाना झाली आहे. बॉम्ब तयार करत असतानाच हा स्फोट झाल्याचे तपासामध्ये समोर आले असून बॉम्ब तयार करणाऱ्यांमध्ये गेल्या वर्षी मध्यप्रदेशातून पळालेल्या सिमीच्या पाच दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पुणे स्फोटात त्यांच्या सहभागाची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अस्लम अय्यूब, जाकिर, महबूब, सलीक, अमजद आणि एजाजुद्दीन अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यामधील महबूब उर्फ गुहा हा अहमदाबाद येथे २००९ साली झालेल्या साखळी स्फोटांतील आरोपी असल्याची माहिती आहे. उत्तरप्रदेशात मोठा घातपात घडविण्यासाठी बॉम्ब तयार करीत असतानाच अचानक स्फोट झाला. जखमी झालेल्या साथीदारांना बाहेर काढून त्यांनी प्रेशर कुकर फुटल्याची माहिती दिली होती. जवळच्या रुग्णालयात उपचार घेऊन हे सर्वजण पसार झाले होते. हे आरोपी जेथे रहात होते त्या घरामधून पोलिसांनी ९ एमएमची पिस्तुल, लॅपटॉप, मोबाइल, सिमकार्ड, बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी साधने, गॅस सिलेंडर आणि तीन ओळखपत्र जप्त केली आहेत. या ओळखपत्रांवर हिंदू नावे लिहिलेली आहेत. गेल्या वर्षी १ आॅक्टोबर रोजी मध्य प्रदेशच्या खंडवा तुरुंगातून पळालेल्या सात कैद्यांपैकी सहा कैदी सिमीचे कार्यकर्ते होते. त्यांचा म्होरक्या अबु फैजल याच्यासह दोघाजणांना अटक करण्यात आली होती. परंतु अन्य पाचजण अद्यापही सापडलेले नाहीत. बिजनोर येथील बॉस्फोटात त्यांचाच सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचप्रमाणे पुणे येथील बॉम्बस्फोटाशी या आरोपींचा काही संबंध आहे काय हे तपासण्याचे काम सुरु आहे. पोलिसांचा त्यांच्यावरचा संशय बळावत चालला असून पुढील तपासासाठी एटीएसच्या पुणे युनिटची एक टीम उत्तरप्रदेशला रवाना झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)