शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

असा झाला पानसरेंवर हल्ला...

By admin | Published: February 16, 2015 10:33 PM

पाळत ठेवून झाला हल्ला

कोल्हापूर: गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा हे दोघे नेहमी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिरायला बाहेर पडतात. सोमवारी ते थोडे उशिरा साडेसातच्या सुमारास फिरायला बाहेर पडले. फिरून ते दोघे गप्पा मारत घरी येत असताना चंपालाल ओसवाल यांच्या बंगल्यासमोर येताच पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी खाली उतरून पाठीमागून व समोरून रिव्हॉल्व्हरमधून पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक गोळी सरस्वती चुनेकर विद्यामंदिरच्या संरक्षण भिंतीला धडकली तर दोन गोळ्या पानसरे यांच्या छातीमध्ये व एक खांद्यामधून आरपार होऊन तोंडाच्या हनुवटीला घासून गेली. डोळ्यासमोर पतीवर झालेल्या हल्ल्याने उमा या जमिनीवर कोसळल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेतही पानसरे रस्त्यावर उठून बसले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. फट फट असा आवाज झाल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांना भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच भारताने जिंकल्याने कोणीतरी फटाके वाजविले असतील असे वाटल्याने त्यांनी दुर्लक्ष केले. ‘घात झाला’ असा मोठ्याने आवाज आल्याने पानसरे यांचे शेजारी शशिकांत नारायण जोग हे गाडी धुताना बाहेर पळत आले. त्यावेळी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पानसरे दाम्पत्य दिसले. त्यांनी आरडाओरड केल्याने पानसरे यांची सून मेघा, नातेवाईक मुकुंद कदम हे पळत आले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर समोरील बंगल्यातील ओसवाल कुटुंबीय पळत बाहेर आले. मेघा पानसरे यांच्या कारमधून गोंविद पानसरे तर नातेवाईक कदम यांच्या कारमधून उमा यांना जवळच्याच अ‍ॅस्टर आधार रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांचे आॅपरेशन घटनेची माहिती ओसवाल यांनी फोनवरून पोलीस नियंत्रण कक्ष व महापालिका अग्निशामक दलास दिली. काही क्षणांतच घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, करवीचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, लक्ष्मीपुरीचे धन्यकुमार गोडसे, जुना राजवाड्याचे दिनकर मोहिते, करवीरचे दयानंद ढोमे, शाहूपुरीचे अरविंद चौधरी आदींसह पोलिसांची पथके दाखल झाली. त्यांच्यापाठोपाठ अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी आले. घटनेचे गांभीर्य ओळखून हल्लेखोर जिल्'ांतून बाहेर पडू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी वायरलेसवरून जिल्'ात कडेकोट नाकाबंदीचे आदेश दिले. विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर राज्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामाघटनास्थळावर पोलिसांना पाच पुंगळ्या मिळाल्या तसेच रक्ताचे व मातीचे नमुनेही पोलिसांनी यावेळी घेतले. हल्लेखोर काही पुरावा सोडून गेले आहेत का हे पाहण्यासाठी घटनास्थळाचा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. पानसरे दाम्पत्यास पहिल्यांदा पाहिले तसेच रुग्णालयात दाखल केले तेथील शेजारील लोकांचे जबाब पोलिसांनी जाग्यावरच घेतले. संपूर्ण घटनेचा पंचनामा पोलिसांनी ओसवाला यांच्या घरासमोरील हॉलमध्ये बसून केला. मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती पानसरे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडून फोनवर घेतली. यावेळी त्यांनी डॉ. शर्मा यांना हल्लेखोरांचा सर्व पातळ्यांवर शोध घेण्याच्या सूचना केल्या. कोळसे-पाटील यांना रडू कोसळले माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांचा गोविंद पानसरे यांच्याशी चांगलाच ऋणानुबंध आहे. रविवारी कोल्हापुरात आलेल्या कोळसे-पाटील यांचे सोमवारी सकाळी गोविंद पानसरे यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यानुसार ते ९.४० वाजता पानसरे यांच्या घरी भेटायला गेले. त्याचवेळी त्यांना हल्ल्याची माहिती कळाली. रुग्णालयाच्या आवारात अत्यंत विमनस्क अवस्थेत उभे राहिलेल्या कोळसे-पाटील यांना अक्षरश: रडू कोसळले. पत्रकारांशी बोलताना कोळसे-पाटील म्हणाले की, आता पुरोगामी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापुढच्या काळात आमची सुरक्षा आम्हाला स्वत:च करावी लागणार आहे.पाळत ठेवून झाला हल्ला गोविंद पानसरे यांच्यावर पाळत ठेऊन हा हल्ला झाला आहे. पानसरे दररोज सकाळी फिरायला जातात परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांनी प्रकृती ठीक नसल्याने त्यांना फिरायला जावू नका, म्हणून डॉक्टरांनी सल्ला दिला होता तरीही ते पत्नी उमासमवेत सोमवारी घराबाहेर पडले. रेड्याच्या टकरीपर्यंत गेले. त्यानंतर त्यांनी एका चहाटपरीवर आवडीची इडलीही खाल्ली तेथून ते परत घराकडे जात असताना त्यांना हल्लेखोरांनी गाठले. एका हल्लेखोराने पानसरे यांच्यावर समोरून गोळ्या झाडल्या. हल्लेखोर भाडोत्री असण्याची शक्यता आहे. ते शार्प शूटर असण्याच्याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. पानसरे दाम्पत्याने कोणताही प्रतिकार केला नाही तरीही झाडलेल्या गोळ्या शरीरात घुसल्याचे समजून हल्लेखोर पसार झाले. हल्लेखोर स्थानिक नसून ते बाहेरगावचे तसेच व्यावसायिक असावेत, असा अंदाज आहे.मान्यवरांची लागली रीघ पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती कळताच रुग्णालयात श्रीमंत शाहू महाराज, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके,आमदार राजेश क्षीरसागर, शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक रमेश जाधव, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे, विश्वास नारायण पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.