माजी विद्यार्थी अटकेत : महाविद्यालयीन काळात तक्रार केल्याचा राग
अमळनेर : महाविद्यालयात शिक्षण घेताना केलेल्या तक्रारींचा राग मनात ठेवत एका माजी टवाळखोर विद्याथ्र्याने एका हाताने अपंग असलेल्या गर्भवती प्राध्यापिकेवर भर वर्गात प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना येथे घडली.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रताप महाविद्यालयातील प्रा. कविता मधुकर सूर्यवंशी अकरावीच्या वर्गात भूगोलाचा तास घेत होत्या. माजी विद्यार्थी तुषार संभाजी जाधव (22, रा. लक्ष्मीनगर, भांडारकर गल्ली) याने महाविद्यालयाचा गणवेश घालून व तोंडाला रुमाल बांधून सकाळी अचानक वर्गात प्रवेश केला. त्याने प्रा. सूर्यवंशी यांचा गळा दाबून पोटावर लाथ मारली. त्या खाली कोसळल्या. तुषारच्या हातात कापडात गुंडाळलेली बाटली होती. वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनी घाबरून उठू लागल्यावर तुषारने सगळ्यांनाच जागेवर बसण्याचा दम भरला. कविता सूर्यवंशी उभ्या राहिल्यानंतर त्याने पुन्हा त्यांना मारहाण केली. त्यानंतर तो पळू लागला. वर्गातील विद्याथ्र्यानी त्याचा पाठलाग केला. जिमखान्याजवळ विद्याथ्र्यानी त्याला पकडले. कार्यालयात आणत असताना तुषारने पुन्हा सूर्यवंशी यांना मारले. प्रभारी प्राचार्य ए. एम. जैन यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले.
आरोपीने मद्यप्राशन किंवा अमलीपदार्थ सेवन केले होते का, त्याच्याजवळील बाटलीत अॅसिड किंवा काही घातक पदार्थ होता का याबाबत चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. (प्रतिनिधी)
कविता सूर्यवंशी यांनी 2क्11-12 मध्ये तुषार अकरावीत शिकत असताना, तो वर्गात त्रस देत असल्यावरून उपप्राचार्याकडे तक्रार केली होती. बारावीतही त्याच्या टवाळखोरीविरोधात सूर्यवंशी यांनी तक्रार केली होती. त्यानंतर त्याला सौम्य शिक्षा झाली होती.
तुषार जाधव हा शिकवताना नेहमी त्रस द्यायचा. त्यामुळे त्याची तक्रार केली होती. त्याला कठोर शासन झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही अन्यथा यापुढे शिक्षकांना वर्गात शिकवणो मुश्कील होईल.
- प्रा. कविता सूर्यवंशी