सातारा : ‘मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी बिबट्या वा अन्य प्राणी दिसताच वनविभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीचा जमावबंदी आदेश मिळवावा,’ अशी सूचना कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक नीलिमकुमार खैरे यांनी बुधवारी केली. ‘वन्यजीवांचे दर्शन झाल्यास गर्दी नियंत्रणात आणण्याची यंत्रणा तयार ठेवा आणि बचावकार्य सुरू असताना माध्यमांना सतत माहिती देत राहा,’ अशा सूचनाही त्यांनी केल्या.सातारा शहरासह जिल्ह्यात बिबट्याचे दर्शन घडण्याचे प्रमाण वाढले असून, गवे, अस्वले आणि रानडुकरांशीही ग्रामस्थांचा सतत संघर्ष होतो. या पार्श्वभूमीवर, आपत्कालीन स्थिती ओढवल्यास यंत्रणा सक्षम असण्याची, तसेच नागरिकांना संवेदनशील, सतर्क बनविण्याची गरज ‘लोकमत’ने वारंवार व्यक्त केली होती. साताऱ्याचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी याविषयीचा कृती कार्यक्रम आखला असून, त्याची सुरुवात ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ याविषयीच्या कार्यशाळेने झाली. ज्यांना वन्यजीवांचा थेट सामना करावा लागतो, त्या वनरक्षक आणि वनपालांना खैरे यांनी मार्गदर्शन केले. ‘मानव-वन्यजीव संघर्ष बहुधा मानवी चुकीमुळेच उद््भवतो,’ असे ठाम प्रतिपादन करून खैरे म्हणाले, ‘उकिडवे बसलेल्या व्यक्तीवर बिबट्या भक्ष्य समजून हल्ला करू शकतो. बिबट्या दिसताच धावपळ उडते. कुणी पाठलाग करतो, तर कुणी फोटो काढू पाहतो. कुणी दगडही मारतो. बिबट्याभोवती गर्दी झाल्यास तो बिथरून हल्ला करू शकतो. त्यामुळे तातडीने १४४ कलम जारी करून वन कर्मचाऱ्यांनी आधी गर्दीवर नियंत्रण मिळवावे. वन्यजीवाला इजा न होता पकडण्यासाठी पुरेशी उपकरणे वनखात्याकडे असावीत. बऱ्याच वेळा वन अधिकारी माध्यमांना टाळतात. मग स्वयंसेवी संस्था व हौशी मंडळी माध्यमांना वेगळेच खाद्य पुरवितात.’ कोल्हापुरात डुक्कर पकडणाऱ्या लोकांकडून बिबट्याला पकडण्याच्या प्रसंगाचे उदाहरण त्यांनी दिले.माणूस आणि वन्यजीव दोघांचेही रक्षण करण्याचा उद्देश या कार्यशाळेमागे असल्याचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी प्रास्ताविकात नमूद केले. विजयकुमार निंबाळकर, अनिल खैरे यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी) दर्शन माणसातल्या हिंस्र पशूचेखैरे यांनी दाखविलेल्या एका चित्रफितीने उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले. गुजरातेत ग्रामस्थांना त्रास देणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर ग्रामस्थांनी मोजक्या वन कर्मचाऱ्यांना न जुमानता पिंजऱ्यावर रॉकेल ओतून बिबट्याला पेटविल्याची ही चित्रफीत पाहून उपस्थितांची मने हेलावली. दिल्लीतील प्राणिसंग्रहालयात वाघाने माणसावर केलेल्या हल्ल्याची सोशल मीडियावरून बरीच फिरलेली चित्रफीतही त्यांनी दाखविली आणि त्यात माणसाचीच कशी चूक होती, हे सप्रमाण दाखवून दिले. गिअर केबलचे फासे, लोखंडी फासे लावून पकडलेल्या प्राण्यांचे हाल दाखविणारी दृष्येही दाखविण्यात आली. अवैध व्यापारात एका वाघाच्या विविध अवयवांपासून तब्बल २० कोटींची कमाई तस्कर करतात, असे खैरे यांनी सांगितले.क्षारासाठी पोटात चिप्सच्या पिशव्याक्षारांची गरज पूर्ण करताना प्राणी क्षारयुक्त दगड चाटतात. मात्र हौशी पर्यटक चिप्सच्या पिशव्या जंगलातच भिरकावतात. या पिशव्यांमधील आयते क्षार खाताना वन्यजीव पिशव्याही खातात. पिशव्या खाल्लेली हरणे सहा महिन्यात खंगून मरतात. त्यांच्या शवविच्छेदनात अनेकदा प्लास्टिक पिशव्या सापडल्या असल्याची सचित्र माहिती देण्यात आली.वन्यजीवांच्या बचावासाठीचा लंगर, कार्बनवर चालणारी नेट गन, अकरा हजार व्होल्टच्या शॉक वेव्ह सोडणारा टॉर्च अशा अनेक आयुधांची माहिती कार्यशाळेत देण्यात आली. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्याचे तंत्र सांगण्यात आले. तसेच वनखात्याच्या हद्दीतील उपलब्ध पाण्याचे ‘मॅपिंग’ करण्याची सूचना करण्यात आली. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठीचे पुढील धडे वन कर्मचाऱ्यांना आता पुण्यात दिले जातील. प्रत्यक्ष बचावकार्यात त्यांना सहभागी करून घेऊन प्रात्यक्षिक दिले जाणार आहे.यामुळे उद््भवतो संघर्षजंगलाच्या कोअर क्षेत्रात गुरे चराईजंगलातून रानहळदीच्या फुलांची तोडवॉर्निश लावून विकण्यासाठी झाडांवरील बुरशी जमविणेवन्यजीवांचे अस्तित्व माहीत असूनही झुडपात प्रातर्विधीलाकूडफाटा, औषधी फळे गोळा करण्यासाठी धोका पत्करणेजंगलातील झरे, धबधब्यांजवळ पर्यटकांची हुल्लडबाजीवन्यजीवांविषयी चुकीचा अंदाज बांधून जवळीकवन्यजीवांसाठी शेतात विष किंवा वीजभारित ताराअसा टाळता येईल संघर्षवन्यजीवांना काही खायला देऊ नकाप्लास्टिक कचरा जंगलात नकोचसेल्फी, फोटोसेशनची हौस टाळाछायाचित्रकारांनी परस्परस्पर्धेसाठी धोका पत्करणे टाळारेबिजचा फैलाव टाळण्यासाठी जंगलाजवळील गावांत पाळीव कुत्र्या-मांजरांची नोंद ठेवाप्राण्यांचे जीवनचक्र विस्कळीत होईल असे उपक्रम नकोतवन्यजीवांना जंगलातच खाद्य-पाणी उपलब्ध कराप्राण्यांचा स्वभाव जाणण्यासाठी लोकशिक्षण वन्यजीवांच्या बचावासाठीचा लंगर, कार्बनवर चालणारी नेट गन, अकरा हजार व्होल्टच्या शॉक वेव्ह सोडणारा टॉर्च अशा अनेक आयुधांची माहिती कार्यशाळेत देण्यात आली. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्याचे तंत्र सांगण्यात आले. तसेच वनखात्याच्या हद्दीतील उपलब्ध पाण्याचे ‘मॅपिंग’ करण्याची सूचना करण्यात आली. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठीचे पुढील धडे वन कर्मचाऱ्यांना आता पुण्यात दिले जातील. प्रत्यक्ष बचावकार्यात त्यांना सहभागी करून घेऊन प्रात्यक्षिक दिले जाणार आहे.
पाण्यासाठी महिलांचा हल्लाबोल
By admin | Published: November 04, 2015 11:06 PM