जालना : जालन्यातील प्रसिद्ध उद्योजक राजेश सोनी यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. जालना शहरातील दत्ताश्रम येथील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. राजेश सोनी यांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला असून, अपहरणकर्त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत राजेश सोनी यांनी तेथून पळ काढल्याची माहिती मिळाली आहे. (attempt to kidnap famous businessman rajesh soni from jalna)
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यापासून सुमारे तीन ते चार कि.मी. अंतरावर असलेल्या दत्ताश्रम येथे प्रसिद्ध उद्योगपती राजेश सोनी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते गाडीजवळ आले. राजेश सोनी यांचा पाठलाग करणाऱ्या एका गाडीतून दोन जण उतरले. या दोघांच्याही हातात पिस्तूल होते. या दोघांनीही राजेश सोनी यांना आग्रहाने त्यांच्या गाडीत बसण्यास सांगितले. मात्र, राजेश सोनी यांनी या दोघांना बोलण्यात गुंतवले आणि तेथून पळ काढत थेट दत्ताश्रमात शिरले, अशी माहिती देण्यात आली आहे.
मास्क काढला, दंड बसला; तीन दिवसांत १८ हजार जणांवर पाेलीस कारवाई
राजेश सोनी यांनी पुन्हा दत्ताश्रमाकडे धाव घेतल्यानंतर त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. या बातमीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. राजेश सोनी यांचा पाठलाग करणाऱ्या दोघांनी देऊळगावच्या दिशेने पसार झाले, असे सांगितले जात आहे.
या प्रकरणी राजेश सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पथक नेमले आहे. अज्ञातांविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस त्या दोन इसमांच्या मागावर असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.