सरकारकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीसांनी खोटे न बोलता...; काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 03:05 PM2022-11-02T15:05:39+5:302022-11-02T15:33:26+5:30

वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी एका व्यक्तीने माहिती अधिकाराखाली अर्ज केला व त्या व्यक्तीला विशेष जलतगती सेवा देत त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत माहिती देण्यात आली असं काँग्रेसनं सांगितले.

Attempts by the government to create confusion; Devendra Fadnavis is lying Says Congress | सरकारकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीसांनी खोटे न बोलता...; काँग्रेसचा टोला

सरकारकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीसांनी खोटे न बोलता...; काँग्रेसचा टोला

googlenewsNext

मुंबई - वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातमध्ये गेला आहे पण त्याचे खापर मात्र महाविकास आघाडी सरकारवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. वेदांता व वेदांता-फॉक्सकॉन हे दोन वेगळे प्रकल्प आहेत पण फडणवीसांकडून याबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत वेदांताच्या गुंतवणुकीसंदर्भात खोटी माहिती दिली. वेदांताचा प्रकल्प फडणवीस यांच्या काळातच आला आणि गेला, तो प्रकल्प मोबाईलचा होता तर वेदांता-फॉक्सकॉन हा १ लाख ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख रोजगार निर्माण होणारा प्रकल्प होता, हा प्रकल्प सेमी कंडक्टरचा होता. यासंदर्भात १५ जुलै २०२२ रोजी सचिवांची उच्चस्तरिय बैठक झाली, सहा-सात विभागाच्या सचिवांचा या बैठकीत सहभाग होता. या उच्चस्तरिय बैठकीत वेदांता-फॉक्सकॉनला किती व कोणत्या सवलती द्यायच्या याचे निर्णय झाले. पाणी, वीज, जमीन, विविध कर यामध्ये सवलती देण्यावर निर्णय झाला असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी एका व्यक्तीने माहिती अधिकाराखाली अर्ज केला व त्या व्यक्तीला विशेष जलतगती सेवा देत त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत माहिती देण्यात आली. फडणवीस हे पुन्हा पुन्हा खोटे बोलण्याचा अश्लाघ्य प्रकार करत असून आरटीआय मधूनही त्यांनी तेच केले. आपल्या हातून झालेल्या चुका लपवण्यासाठी ही धडपड सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकार चुका लपवण्याचे काम करत आहे. फडणवीसांच्या काळात १६ लाख कोटींचे करार झाले होते पण १६ रुपयांचीही गुंतवणूकही आली नाही असा आरोप काँग्रेसनं केला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात पक्षीय राजकारण न करता जास्तीत जास्त गुंतवणूक व जास्त रोजगार आणले पाहिजेत, यासाठी विरोधी पक्षही सरकारला मदत करण्यास तयार आहे पण भाजपाचे राजकारण हे धर्मावर व श्रेय लाटण्याचे राजकारण आहे. तसेच १२ कोटी जनतेला धोका कसा द्यायचा हेच भाजपा व फडणवीस यांचे राजकारण आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो असंही मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Attempts by the government to create confusion; Devendra Fadnavis is lying Says Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.