मुंबई - लोकसभा निवडणुकीत राज्यातील दिग्गजांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी काय होणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वच चॅनेल्सच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीला मोठे यश मिळेल, असा अंदाज वर्तविला आहे. उद्याच्या निकालात या पोलवर शिक्कामोर्तब होईल की पोलचा भ्रमाचा भोपळा फुटेल याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क दिले जात आहेत. केंद्रातील नव्या राजकीय परिस्थितीचे पडसाद राज्याच्या राजकारणावरही पडतील, अशी शक्यता आहे. निकालात अनेकांची राजकीय प्रतिष्ठा आणि भवितव्य पणाला लागले आहे. केंद्रीय गृहमंत्री काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), केंद्रीय अवजड उद्योग मंत्री राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल (भंडारा-गोंदिया), नितीन गडकरी आणि विलास मुत्तेमवार (नागपूर), गोपीनाथ मुंडे (बीड), माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक (रामटेक), गुरुदास कामत (उत्तर-पश्चिम मुंबई), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (नांदेड), केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई), माणिकराव गावित (नंदुरबार), प्रिया दत्त (उत्तर-मध्य मुंबई), सुप्रिया सुळे (बारामती), सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ (नाशिक), राजू शेट्टी (हातकणंगले), अनंत गीते (रायगड) आदींच्या भाग्याचा फैसला उद्या होईल. (विशेष प्रतिनिधी)
दिग्गजांकडे लक्ष
By admin | Published: May 16, 2014 2:56 AM