कर्जत : कर्जत शहरातील पाटील आळीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी मंडळाचे हे ५१ वर्ष आहे. गेल्या पन्नास वर्षात मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा वारसा जपला आहे. गेल्या ३८ वर्षांपासून मंडळाच्या वतीने दिवाळीत रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने मोठ्या प्रमाणात रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कलाकार किसन खंडोरी यांनी काढलेल्या आर्चीच्या रांगोळीला नागरिकांची पसंती मिळत आहे. उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे हाच मंडळाचा हेतू आहे. मंदिराच्या सभागृहात आयोजित हे प्रदर्शन २ नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.रायगड भूषण अॅड. राजेंद्र निगुडकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष गणपत दगडे, अशोक शिंदे, दत्तात्रय म्हसे, अनिल मोरे, अँड. निलेश मोरे, विनायक गुरव, अशोक थोरवे, राजेश मोरे, मोहन जाधव, रामिकशोर गुप्ता, अरु ण विशे आदी उपस्थित होते. गणपत दगडे यांनी स्वागत केले. अनिल मोरे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या विविध उपक्र मांची माहिती दिली. या प्रसंगी रंगावली कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
रांगोळी प्रदर्शनात आर्चीचे आकर्षण
By admin | Published: October 31, 2016 3:20 AM