पोलादपूर : पावसाळा सुरु झाला की मुंबई, पुणो, ठाण्यासह सर्व शहरवासीयांचे सुट्टीमधील फिरण्याचे ठिकाण म्हणजे कोकण. कोकण हा निसर्गसंपन्न प्रदेश जिकडे तिकडे हिरवी शाल पांघरुण धरणीमाता सजलेली असते. कोकणच्या डोंगर - द:या पावसाळय़ात काश्मीर खो:याची आठवण करुन देतात. कधी डोंगरावरुन वाहणारा जलप्रपात फेसाळल्या दुधाप्रमाणो भासतो. तर डोंगर द:यातून झुळझुळ वाहणारे पाणी वेगळेच संगीतमय गाणो गात असल्याचा भास करते.
पोलादपूर तालुक्यात पावसाळय़ात असंख्य धबधबे निर्माण होतात. मात्र आकर्षणाचा मानबिंदू ठरतो तो उमरठजवळील मोरझोत धबधबा. उमरठजवळील चांदकके व खोपड गावच्या मध्यभागी हा असणारा धबधबा जवळजवळ 2क्क् ते 25क् फुटावरुन कोसळतो. या कडय़ा कपा:यात निर्माण झालेली नैसर्गिक गुहा व आजूबाजूचा हिरवागार परिसर एकवेगळय़ा विश्वात आपल्याला घेवून जातो. उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामांच्या समाधीला नतमस्तक होऊन येथे येणारा प्रत्येक पर्यटक नंतरच मोरझोतकडे जातो. वरुन एकसंध येणारा मोरझोतचा हा जलप्रपात जमिनीवर पडताच जसा मोर आपले पंख पसरुन थुईथुई नाचत असल्याचा भास निर्माण करतो.
या धबधब्यावर महाड - पोलादपूर तालुक्यासह मुंबई - ठाणो येथील पर्यटक मोठय़ा संख्येने येतात.
सवतकडा धबधब्यावर गर्दी
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीत अतिशय जंगलभागात सवतकडा हा धबधबा आहे. सुमारे 2क्क् फूट डोंगरमाथ्यावरुन जमिनीवर खाली पाणी पडत असते. उंचावर वरुन पडणा:या या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. सुट्टीच्या शनिवार व रविवार येथे पर्यटकांचा लोंढा दिसतो. या ठिकाणावर जाण्यासाठी सायगाववरुन तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. शहरापासून दूर व अतिशय घनदाट वृक्षाच्या दाटीतून ही पायपीट करुन त्या ठिकाणी पोहचता येते. नीरव शांतता व खळखळणा:या पाण्याचा आवाज यामुळे वातावरणात येथील पर्यटक मंत्रमुग्ध होवून जातात. याठिकाणी पक्का रस्ता उपलब्ध व्हावा, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.