शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

फणसाड अभयारण्याचे पर्यटकांना आकर्षण

By admin | Published: April 19, 2016 1:58 AM

निसर्गसौैंदर्य समृद्ध मुरुड तालुक्यातील सुपेगाव येथील फणसाड वन्यजीव अभयारण्य पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे. जगभरातील पर्यटक येथील निसर्गसौंदर्य वनसंपदा

गणेश चोडणेकर, आगरदांडानिसर्गसौैंदर्य समृद्ध मुरुड तालुक्यातील सुपेगाव येथील फणसाड वन्यजीव अभयारण्य पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे. जगभरातील पर्यटक येथील निसर्गसौंदर्य वनसंपदा, वन्यजीव प्राणी व पक्षी यांच्या सान्निध्यातील मनमुराद आनंद लुटण्यासाठी भेटी देत असतात. सध्या शाळांना उन्हाळी सुट्या लागल्याने पर्यटकांची मोठी गर्दी येथे दिसून येत आहे. या अभयारण्यात ७१८ प्रकारचे वृक्ष, १७ प्रकारचे सस्तन प्राणी, १६४ प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, २७ प्रकारचे साप, औषधी वृक्ष या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शुद्ध हवा, गारवा या निसर्ग किमयेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक या अभयारण्याकडे आकर्षित होत आहेत. मुंंबईपासून १५४ किमी अंतरावर विस्तारलेल्या या अभयारण्याला जणू निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मुरुड जंजिरा संस्थानचे नबाब यांचे मालकीचे शिकार स्थळ म्हणून सदर जंगलाचा वापर होत असे. या ठिकाणच्या जैवविविधतेचे संरक्षण व्हावे व निसर्गाचा अनमोल ठेवा सुरक्षित राहावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रुवारी १९८६ मध्ये फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले. जंगल संरक्षण, वन्यजीवांचे संवर्धन व व्यवस्थापन यासाठी ठाणे यांच्याकडे १९९४ मध्ये हस्तांतरित करण्यात आले. या अभयारण्यात ९० प्रकारची फुलपाखरे येथे आनंदाने बागडताना दिसतात. ज्यात प्रामुख्याने ब्लू मॉरगॉन, मॅप तसेच या ठिकाणी १७ प्रकारचे वन्यप्राणी यामध्ये रानससा, सांबर, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू येथे हमखास दृष्टीस पडते. महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेला हा झुबकेदार शेपटीचा प्राणी उंच झाडावर आढळतो यांची घरटी वैशिष्ट्यपूर्ण असतात. पिसोरी हे जगातील सर्वात लहान हरीण म्हणून ओळखले जाते. तसेच अनेक वन्यश्वापदे आढळतात.