शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

५२ कोटीच्या वसुलीसाठी वसंतदादाच्या मालमत्तेचा २६ रोजी लिलाव

By admin | Published: October 13, 2016 8:24 PM

सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या ५२ कोटीच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी महसूल विभागातर्फे दि. २६ आॅक्टोबर

ऑनलाइन लोकमतमिरज, दि. 13 - सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या ५२ कोटीच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी महसूल विभागातर्फे दि. २६ आॅक्टोबर रोजी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. मिरजेच्या तहसीलदारांकडून जप्तीद्वारे थकीत बिलाच्या वसुलीसाठी लिलावाची अंतिम नोटीस कारखान्यास बजाविण्यात येणार आहे. वसंतदादा साखर कारखान्याचे २०१३ व १४ च्या उसाचे ४६ कोटी ३९ लाख रुपयांचे बिल व इतर देणी शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. याबाबत शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. या आंदोलनांमुळे कारखान्याची मालमत्ता जप्त करावी व तिच्या विक्रीद्वारे रक्कम वसूल करून शेतकऱ्यांची देणी देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते. १२ जुलै २०१४ रोजी महसूल विभागाने महसूल वसुली प्रक्रिया सुरू करून कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई सुरू केली. कारखान्याच्या कर्मचारी वसाहतीसह शेजारील २१ एकर भूखंडाची विक्री करून शेतकऱ्यांची देणी भागविण्याच्या कारखाना व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्याने, जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने जमीन विक्री बारगळली.जप्ती व वसुलीच्या तीन नोटिसा बजावल्यानंतरही शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाची रक्कम अद्याप वसूल झालेली नाही. त्यामुळे महसूल विभागामार्फत जमीन विक्रीसाठी वसुलीस देण्यात आलेली स्थगिती उठवून पुन्हा कारखान्याच्या सर्वच मालमत्तेवर शासनाचा बोजा चढविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. शेतककऱ्यांच्या उसाचे बिल व थकीत देणी असे ५२ कोटी रुपये वसुलीसाठी २६ आॅक्टोबररोजी कारखान्याची इमारत वगळता इतर मालमत्ता व जमिनीचा मिरजेच्या तहसील कार्यालयात लिलाव करण्यात येणार आहे.लिलावात मालमत्तेची विक्री न झाल्यास मालमत्तेच्या सात-बारा उताऱ्यावर मालक म्हणून शासनाची नोंद करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना कारखान्याच्या मालमत्तेच्या लिलावाची नोटीस बजावण्यात येणार आहे. कारखाना कर्मचाऱ्यांची सुमारे एक कोटीची देणी थकित असल्याने, महसूल विभागामार्फत न्यायालयाच्या आदेशाने या रकमेच्या वसुलीची प्रक्रियाही सुरू आहे.चौकटवसंतदादा कारखान्याने थकीत ऊस बिलापैकी २५ कोटी रुपये दिल्याचे कारखाना व्यवस्थापनाने कळविले आहे. मात्र शेतकऱ्यांची सर्व देणी देईपर्यंत कारखान्याच्या मालमत्ता जप्तीची व लिलावाद्वारे रक्कम वसुलीची कारवाई सुरूच राहणार आहे.चौकटवसंतदादा कारखान्याने शेतकऱ्यांची देणी बऱ्यापैकी दिली आहेत. केवळ साडेनऊ कोटी रुपये थकीत असल्याची यादीही आम्ही शासनाकडे सादर केली आहे, तरीही प्रशासनाकडून ५२ कोटीच्या वसुलीसाठी नोटिसा बजाविल्या जात आहेत. त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळेच शेतकऱ्यांची देणी थकीत आहेत. त्यांनी साडेनऊ कोटी रुपयांच्या देण्यापोटी वसुलीची प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. पूर्ण रकमेची वसुली होऊ शकत नाही, असे मत कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केले.