मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Cruise drug party case) आरोप-प्रत्यारोपांची मालिका थांबायचे नाव घेत नाही. या प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आज आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. या संदर्भात नवाब मलिक आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र, यापूर्वी नवाब मलिक यांनी एक ऑडियो क्लिप ट्विट केली आहे. या क्लिपमध्ये सॅनविल डिसुझा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा नबाव मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या दाव्यानुसार, क्लिपमध्ये सॅनविल डिसुझा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद आहे. यामध्ये सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीबाबत विचारणा करत आहे. दरम्यान, हा संवाद हिंदी भाषेत आहे. तो मराठीत असा आहे...
सॅनविल- सर सॅनविल बोलतोयव्ही व्ही सिंह- कोन सॅनविलसॅनविल- सर, तुम्ही एक नोटिस दिली आहे ना मला.सिंह- अच्छा, सॅनविल, सॅनविल.. बांद्र्यात राहतो ना तू.सॅनविल- हो, सर. मी जरा बाहेर होतो. माझी तब्येत बरी नव्हती. मला माहिती मिळाली. सिंह- मग आता परत ये.सॅनविल- मी अजून पोहोचलेलो नाही. तब्येतही खराब आहे. सर मला एक दिवस हवा आहे आणखी.सिंह- मग कधी येशीलसॅनविल- मी सोमवारी येऊ का?सिंह- सोमवारी नको मग तू बुधवारी ये. सोमवारी मी नाही.सॅनविल- ओके सर.सिंह- आणि ऐक. मोबाईल घेऊन ये. मला आता जास्त नाटकं नको आहेत. माझ्याकडे तुझा IMI नंबर आहे. तोच फोन घेऊन ये. मी तुला आधीच वॉर्निंग देतोय.सॅनविल- ओके, सर मी तसं नाही करणारसिंह- ओके. मग बुधवारी ये.
दरम्यान, शनिवारी भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. या सर्व प्रकरणात सुनील पाटील नावाचा व्यक्ती मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करत मोहित कंबोज यांना प्रत्यु्त्तर दिले होते. या संदर्भात नवाब मलिक आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना या प्रकरणाच्या चौकशीतून हटवण्यात आले आहे. त्यामुळे समीर वानखेडेंवर सातत्याने तोफ डागत असलेल्या नवाब मलिकांच्या आजच्या पत्रकार परिषदेत तोफेच्या तोंडी कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.