शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

ऐन दिवाळीत सुगीचा हंगाम जोरात

By admin | Published: October 31, 2016 4:43 AM

आजरा तालुक्यात भात कापणी व मळणीला वेग आला असून ऐन दिवाळीच्या सणात सुगीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे.

कृष्णा सावंत,

आजरा (कोल्हापूर)- आजरा तालुक्यात भात कापणी व मळणीला वेग आला असून ऐन दिवाळीच्या सणात सुगीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. सर्वच जातीच्या भात कापणीला वेग आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात तालुक्यातील शेतकरी भात कापणीत मग्न झाला आहे. दिवाळी सण सुरू व्हायलाच भात कापणीला आले आहे. सण साजरा करायला शेतकऱ्यांना सवड नसून शेतातच मळणीच्या रूपात शेतकरी सण साजरा करत आहे.यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने माळरानावरील भात पिके कापणीला आली आहेत. माळरानावरील भात जोमाने वाढली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याने दिवाळीऐवजी सुगीला प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील शेतकरी गावाऐवजी रानात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. बहुतांश शेतकरी सुगीच्या धांदलीत दिवाळीचा सणच विसरून गेले आहेत. यावर्षी आजरा बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. शेतकरी वर्गाचा खरेदीसाठीचा अल्प प्रतिसाद दिसला. त्यामुळे सुगीच्या धामधुमीत दिवाळीचा धमाका कमी झाला आहे. तालुक्यातील सर्वच गावातील शेतकरी सुगीत गुंग झाला आहे.चालू वर्षी भात उतारा घटला यावर्षी पाऊस चांगला झाल्याने भात उत्पादनात वाढ होईल असे वाटत होते. मात्र, यावर्षी भात उत्पादनात घट दिसून येत आहे. त्याऐवजी गतवर्षी पाऊस नसतानाही भाताच्या उताऱ्यात वाढ होती.आजरा तालुक्यातील परिस्थिती, शेतकऱ्याची दिवाळी शेतातपेरणोली (ता. आजरा) येथील शेतकरी बैलांच्या सहाय्याने लोप पावत चाललेली भात मळणी आजही जिवंत ठेवला आहे.