औरंगाबाद, दि. 10 - पती सतत चारित्र्यावर संशय घेत मारहाण आणि शिवीगाळ करीत असल्याच्या रागातून पत्नीनेचं २ लाख रूपयाची सुपारी देऊन जितेंद्र होळकर या बँक अधिका-याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील छत्रपतीनगरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेकटा शाखेचे व्यवस्थापक जितेंद्र नारायण होळकर यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. शुक्रवारी मध्यरात्री दोन च्या सुमारास ही घटना घडली.गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये सुपारी देणाऱ्या पत्नीसह तीन मारेकऱ्यांना अटक केली . पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी कारवाई करीत सुपारी देणारी मृताची पत्नी भाग्यश्री, मध्यस्थ असलेला शिवसेना शाखाप्रमुख किरण गणोरे आणि प्रत्यक्ष खून करणाऱ्या शेख तौसीफ आणि शेख बाबु यांना शनिवारी रात्री अटक केली.दोन ते तीन महिन्यापासून भाग्यश्री ही पतीच्या त्रासापासून सुटका करावी याकरिता तिच्या ओळखीचा किरण गणोरे याच्याकडे आग्रह करीत होती. तेव्हापासून हा खून करण्यासाठी ते प्लॅनिंग सुरू होते. होळकर यांची पत्नी भाग्यश्री होळकर हिने त्याचा काटा काढण्याचा डाव रचला. यानंतर गणोरे याने त्यांच्या ओळखिचा तौसीफला ही बाब सांगितली.तो हे काम करण्यास तयार झाला. मात्र, त्याने ही बाब भाग्यश्रीच्या तोंडून एकायचे असल्याचे तो म्हणाला .त्यानंतर काही दिवसाने गणोरेने जिल्हा परिषद कार्यालयबाहेर भाग्यश्रीची भेट करून दिली तेथे भाग्यश्रीने आरोपीला जितेंद्रपासून सुटका करा तुम्हाला आम्ही भरपुर पैसे देऊ असे सांगितले. हे काम करण्यासाठी १० हजार रुपये अडव्हान्सही त्याला दिले. खुनानंतर उर्वरित १ लाख ९० हजार देण्याचे ठरले होते.घट्नेच्या दिवशी आरोपीला मदत करण्यासाठी भाग्यश्रीने दाराची कडी उघडून ठेवली होती हे तपासात समोर आले. पोलिसांनी कांबी येथून खुनाची सुपारी देणाऱ्या पत्नीला अटक केले. याप्रकरणानंतर अनेकांना धक्का बसला आहे. गुन्हे शाखेचे निरिक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकॉ संतोष सोनवणे , लालखा पठाण, योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात आणि कर्मचाऱ्यानी ही कामगिरी केली.
औरंगाबाद बँक अधिकारी हत्या, पत्नीनेच दिली होती सुपारी, पत्नीसह चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 1:38 PM