औरंगाबाद : शिवसेनेचे पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट, माजी आ. प्रदीप जैस्वाल, अण्णासाहेब माने, ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेल्या वादावर मंगळवारी सकाळी मुंबईत शिवसेना भवनात खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. बैठकीसाठी सेनेतील दोन्ही गट सोमवारी मुंबईला रवाना झाले. आ. शिरसाट यांच्यासह जैस्वाल, माने, त्रिवेदी यांनी दानवे यांच्यावर पक्ष विक्रीचा आरोप केल्यानंतर पक्षाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परदेशात असून, त्यांच्या आदेशाने खा. देसाई हे बैठक घेऊनप्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठाकरे परदेशातून येईपर्यंत हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ठाकरे आल्यानंतर पुन्हा बैठक होणार असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. पालकमंत्री रामदास कदम, खा. चंद्रकांत खैरे आदींची यावेळी उपस्थिती असेल.
औरंगाबादचा वाद आज ‘सेनाभवना’त
By admin | Published: September 13, 2016 5:04 AM