- राम शिनगारेऔरंगाबाद : देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत वातानुकूलित बसथांबे उभारण्याचे डिझाइन करण्याचा मान राजन प्रधान यांना मिळाला आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात प्रधान यांच्या सौंदर्यदृष्टीतून साकारलेले बसथांबे दिल्लीत उभे राहणार आहेत.दिल्लीत वातानुकूलित बसथांबे उभारण्यासाठी केजरीवाल सरकारने निविदा मागवल्या होत्या. ज्या कंपनीला निविदा मिळाल्या, त्या कंपनीने वातानुकूलित बसथांबा डिझाइनची स्पर्धा आयोजित केली. यामध्ये औरंगाबादचे डिझायनरराजन प्रधान यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या योजनेंतर्गत १५६ ठिकाणी प्री-असेम्बल्ड प्रकारचे बसथांबे उभारले जातील. त्यासाठी ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाले, त्यांनी देशभरातून विविध डिझायनरची स्पर्धा आयोजित केली. यामध्ये आयआयटीसह इतर नामांकित संस्थांमधील ५०० हून अधिक डिझायनर्सने सहभाग नोंदवला होता. त्यात प्रधान यांना प्रथम पारितोषिक मिळाले. अत्यंत व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक असे हे डिझाइन असल्याचा दावा प्रधान यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.असे आहे डिझाइन- एकाच जागी असेम्बल करून बसथांबा कुठेही नेऊन बसविता करता येऊ शकतो.- संमिश्र साहित्य ते मेटल फ्रेमवर्कपासून बसथांबा बनवला जाणार आहे.- या बसथांब्यावर मुबलक ब्रँडिंगची सोय, प्रकाश योजना, एर्गोनॉमिक्स असणार आहे.
औरंगाबादच्या डिझायनरचा दिल्लीत डंका! बसथांब्यांच्या डिझाइनला प्रथम क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 1:21 AM