ऑनलाइन लोकमत
औंरगाबाद, दि. २३ - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीची बहुमताकडे घोडदौड सुरू असून सलग सहाव्यांदा पालिकेवर भगवा फडकण्याची चिन्हे आहेत. मात्र महायुतीला एमआयएमने जोरदार लढत दिल्याचे चित्रही दिसत आहे. औरंगाबादमध्ये महायुतीला ५४ जागांवर आघाडी मिळाली असून एमआयएम २२ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र औरंगाबादमध्ये पिछेहाट झाली असून काँग्रेस ७ तर राष्ट्रवादी ३ जागांवर आघाडीवर आहे. औरंगाबाद महापालिकेत दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १११ जागांसाठी काल मतदान पार पडले.
महायुतीला बहुमतासाठी आणखी थोड्याच जागांची गरज आहे.
दरम्यान शिवसेनेच्या माजी महापौर कला ओझा यांना पराभवाचा धक्का बसला आहे.