शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

औरंगाबादमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

By admin | Published: June 26, 2016 5:50 PM

भरधाव जाणा-या मालवाहू ट्रकने रास्ता ओलांडणा-या दुचाकीस्वार तरुणांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला.

ऑनलाइन लोकमत 
 
औरंगाबाद, दि. २६  - भरधाव जाणा-या मालवाहू ट्रकने रास्ता ओलांडणा-या दुचाकीस्वार तरुणांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला तर सोबतचा अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. नारेगावकचरा डेपोजवळील केंब्रिज ते सावंगी बायपास रस्ता चौकात रविवारी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. 
 
शेख सिद्दीकी शेख चाँद(१९,रा.चिश्तिया कॉलनी)असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सोहेल शौकत शेख (१७,रा.सदर)हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्यास एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, शेख सिद्दीकी आणि सोहेल हे रविवारी सकाळी साडेअकरा ते पावणे बारा वाजेच्या सुमारास मोटारसायकलने (क्रमांक एमएच-२०सीबी ९१५२)नारेगावकडून पीरवाडीकडे जात होते. 
 
त्यांची दुचाकी नारेगाव कचरा डेपोपासून पुढे पीरवाडीकडे जाण्यासाठी सावंगी ते केंम्ब्रिज शाळा हा वळण रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर आली. त्याचवेळी सावंगीकडून भरधावपणे केंम्ब्रिज शाळेकडे टाईल्स घेऊन जाणा-या ट्रकने (क्रमांक एमएच-२०बीई ३४५७)त्यांना जोराची धडक दिली. 
 
हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालक सिद्दीकी हा दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली आला आणि घटनास्थळीत गतप्राण झाला. या अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून ठाण्यात पळून गेला. हा अपघात घडताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. 
 
एमआयडीसी सिडको पोलिसांनाही घटनेची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर सांगळे, पोलीस नाईक हवालदार एल.एस. कोलते यांनी घटनास्थळी जाऊन मृताचे शव घाटीत हलविले.
 
तर जखमी सोहेल यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत तरूण छत्रपती कॉलेजमध्ये शिकत होता. शिवाय तो सेंट्रींगचे काम करायचा. त्याचे वडिल मजूरी करतात. त्यास एक भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात ट्रकचालक रामेश्वर पांडुरंग राजाहे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.