औरंगाबाद : लग्नानंतर सासरी पाय ठेवताच सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या नववधूला सासरच्या मंडळींनी चक्क सहा महिने डांबून ठेवले. तिला दिवसरात्र घरकामासाठी जनावरासारखे राबवून घ्यायचे अन् काम संपताच बाथरूममध्ये डांबायचे, असा प्रकार सुरू होता. धक्कादायक म्हणजे जेवणात तिला गाईचे शेण अन् पिण्यासाठी पाण्याऐवजी गोमूत्र दिले जात होते. सोमवारी शेजाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने पीडित विवाहितेची सुटका केली. सारिका वैजिनाथ जाधव (१९, रा. सध्या साईनगर, मिसारवाडी) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. अन्नपाण्याविना सारिकाची प्रकृती अत्यंत नाजूक झाली असून, सुटका करताच पोलिसांनी तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मूळ परभणीची असलेल्या सारिकाला वडिलांचे छत्र नसल्याने तिच्या मावशीने संजय अग्रवाल (२६, रा. साईनगर, मिसारवाडी) याचे स्थळ तिच्यासाठी आणले, पसंती झाली. सहा महिन्यांपूर्वी संजय आणि सारिकाचा विवाह झाला. सुखी संसाराचे स्वप्न उराशी बाळगून सारिका औरंगाबादेत सासरी दाखल झाली. मात्र सासरी तिचे स्वप्न धुळीस मिळाले. बाथरूममध्ये डांबायचे...लग्न होताच सासरची मंडळी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागले. दिवसभर ती राबत होती. नंतर तिला अन्नपाणी देणेही बंद झाले. जेवण मागितल्यानंतर तिला गाईचे शेण आणून दिले जात. पाणी मागितले तर गोमूत्र मिळत असे, असे सारिकाने माध्यमांसमोर बोलताना सांगितले.शेजाऱ्यांना लागली कुणकुणसहा महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार सुरू होता. शेजाऱ्यांना त्याची कुणकुण लागली. त्यांना ते पाहावले नाही. अखेर सोमवारी सायंकाळी त्यांनी ही माहिती सारिकाची मावशी सुवर्णा वंजारे आणि सिडको पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. सारिकाचा पती संजय, सासू, नणंद ,दीर यांनी तिला घराबाहेर जाण्यास विरोध केला. पोलिसांनी खाक्या दाखवीत संजयला ताब्यात घेतले.
औरंगाबादमध्ये विवाहितेचा छळ, खायला शेण अन् प्यायला गोमूत्र!
By admin | Published: December 01, 2015 1:08 AM