औरंगाबाद : दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीलय कॉरिडर (डीएमआयसी), शेंद्रा आणि आॅरिकमध्ये उद्योग येण्यासाठी स्वीडनमध्ये मार्केटींग करण्यात आली असून तेथील ४०० उद्योग सध्या भारतात आहेत. त्यांच्याशी गेल्या महिन्यांत चर्चा केल्यानंतर आशा पल्लवीत झाल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. मोठ्या गुंतवणुकीबाबत आता स्वीडनच्या उद्योगांवर मदार असल्याचे देसार्इंच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.
सीएमआयएच्या देवगिरी ईलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रा.लि.च्या भूमीपुजनप्रसंगी ते शेंद्रा येथे बोलत होते. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, देशातील पहिले ईलेक्ट्रॉनिक क्लस्टरचे भूमीपुजन येथे होत आहे. येथील इको सिस्टिम, दळणवळण, बाजारपेठ, कुशल मनुष्यबळामुळे जगभरातील कंपन्या औरंगाबादचा विचार करतील. व्हेंडर सिस्टिम चांगली असल्याचे मध्यंतरी स्वीडन दौ-यामध्ये तेथील उद्योगांना सांगितले. ई-मोबिलिटीचा पुढचा काळ असणार आहे. इलेक्ट्रॉनिक कार उत्पादनाची यापुढील बाजारपेठ असणार आहे. महाराष्ट्र अॅटो हब म्हणून ओळखला जातो आहे. मुख्यमंत्र्यासोबत केलेल्या स्वीडन दौ-यात मराठवाडा आणि औरंगाबादचे मार्केटींग केले. गुंतवणुकीबाबत कंपन्यांचे नाव घेतले की, चर्चा होते. आपण हवेतच राहतो. असे बोलून त्यांनी नवीन गुंतवणुकीचा मुद्दा टाळला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा.चंद्रकांत खैरे,संजय केसकर, सीएमआयचे अध्यक्ष प्रसाद कोकिळ, क्लस्टरचे संचालक सुरेश तोडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ,उद्योजक विवेक देशपांडे, मानसिंग पवार, राम भोगले,जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आदींची उपस्थिती होती. प्रास्तविक कोकिळ यांनी केले, तोडकर यांनी क्लस्टरचे फायदे विशद केले. विजय देवळाणकर यांनी आभार मानले.
भाजपने लगावला टोलाविधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले, देसाई साहेब येथील औद्योगिक प्लॉट लवकर भरावेत ही अपेक्षा आहे. येथील शेतक-यांनी मोठ्या अपेक्षेने जमिनी दिल्या आहेत.