ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ९ - औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील बिबट्याच्या दोन नवजात पिलांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला तर, प्रकृती चिंताजनक असलेल्या तिस-या पिल्लाचा बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला. साडेचार वाजता त्या पिलाला फिट आली होती. हेमलकसा येथून २० दिवसांपूर्वी आणलेल्या रेणू नावाच्या मादी बिबट्याने सोमवारी रात्री तीन पिलांना जन्म दिला होता. मात्र त्यापैकी दोघांचा आज सकाळी मृत्यू झाला.
आश्चर्याची बाब म्हणजे रेणू गर्भवती आहे हे महापालिकेच्या डॉक्टरांना माहितच नव्हते. ती जेवण करीत नसल्याने तिच्यावर वेगवेगळे उपचार करण्यात येत होते. या उपचारांमुळे वेळेपूर्वीच तिची प्रसूती झाल्याचे समोर आले.