शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ज्या औरंगजेबाचं उद्धव ठाकरेंनी भरसभेत कौतुक केले; त्याची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 2:43 PM

औरंगजेब आरआरच्या कोअर कमिटीचा सदस्य होता. २०१७ नंतर काश्मीरात अनेक ऑपरेशन्स झाले.

छत्रपती संभाजीनगर - आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही ते राष्ट्रीयत्व आहे. काश्मीरातील सैनिक औंरगजेब जो देशासाठी लढला तो औरंगजेब त्याला अतिरेक्यांनी मारला तो देशासाठी शहीद झाला तो आपला अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत औरंगजेबाचं कौतुक केले. महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते. परंतु भारतीय इतिहासात औरंगजेबाचं असं चरित्र आहे ज्यावरून अनेक वाद आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी कौतुक केलेला औरंगजेब कोण हे जाणून घेऊया. 

'त्या' दिवशी गावात ईद साजरी करण्यासाठी जात होता औरंगजेब१४ जून २०१८ रोजी संध्याकाळी पुलवामाच्या कालम्पोरा इथं एक मृतदेह सापडला. कालम्पोरापासून १० किमी अंतरावर जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या पथकाला गोळ्यांनी छिन्न केलेला मृतदेह सापडला. डोक्यावर, शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. हा मृतदेह ४४ राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचा असल्याची पुष्टी झाली. १४ जूनच्या सकाळी रायफल मॅन औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी राजौरी येथील त्याच्या गावाला जात होता. परंतु दहशतवाद्यांनी त्याचे मध्येच अपहरण केले. त्यानंतर तिरंग्यातून त्याचा मृतदेहच घरी आला. 

शूर जवानानं हिज्बुल कमांडर समीर टायगरचा खेळ खल्लास केलाऔरंगजेबाची हत्या करण्याआधी दहशतवाद्यांनी त्याचा क्रूर छळ केला. औरंगजेबाचं नाव भारतीय सैन्याच्या त्या शूर जवानांमध्ये घेतले जाते. हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी समीर टायगरला ३० एप्रिल २०१८ रोजी चकमकीत ठार केले होते. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीचं नेतृत्व मेजर रोहित शर्मा करत होते. त्यांच्या टीममध्ये औरंगजेब होता. काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये औरंगजेबनं सहभाग घेतला आहे. औरंगजेब हा भारतीय लष्करात जम्मू काश्मीरच्या इंफ्रेंट्रीचा भाग होता. तो ४४ राष्ट्रीय रायफल्ससोबत काम करायचा. 

....म्हणून हिटलिस्टवर होता औरंगजेबऔरंगजेब आरआरच्या कोअर कमिटीचा सदस्य होता. २०१७ नंतर काश्मीरात अनेक ऑपरेशन्स झाले. त्यात २६० हून अधिक दहशतवादी मारले गेले. एकट्या दक्षिण काश्मीरात ३० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जैश ए मोहम्मदचा मौलाना मसूद अजहरचा भाचा महमूद भाईला आर्मीने यमसदनी धाडले. त्या टीममध्ये औरंगजेब होता. समीर टायगर विरोधात कारवाईतही त्याने महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे औरंगजेब दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होता. मे २०१९ रोजी पुलवामा चकमकीत औरंगजेबाची हत्या करणाऱ्या शौकत अहमद डारसह ३ जवानांना मारून भारतीय लष्कराने औरंगजेबाच्या हत्येचा बदला घेतला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी